Sunday, September 8, 2013

अपराजित दाभोलकर

अपराजित दाभोलकर
20 ऑगस्ट 2013 ,रक्ताच्या थारोळ्यात पडलाय, फुटपाथच्या कडेला, 
पण,
अंधाराच्या सनातनी दुतांनो, मी तुरूंगातून बघतोय तुमच्या पराभवाची नांदी
दाभोलकरांच्या प्रतिमेवर फुली मारून, तुम्हाला करायची होती
दाभोलकरांची इतकी जीवघेणी घृणा
तर खुशाल करायची होती मूठ मारून भानामती,
आणि टाकायची होती मुरगाळून एखादी कोंबडी,
दाभोलकरांच्या नावानं, 108 भटजींचा कळप घेऊन, रचायचा होता एखादा महायज्ञ
अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या दारात
दाभोलकरांच्या वैज्ञानिक दृष्टीला भस्मसात करण्यासाठी
करायची होती करणी अंनिसवर, मांत्रिकाकडून घ्यायचा होता अंगारा धुपारा
आणि जादुटोण्यानं करायचा होता आळाबांधा
दाभोलकरांच्या विवेकवादी विचारांचा...........
एखाद्या चमत्कारी बुवाकडून,एखाद्या अवतारी माताकडून,एखाद्या गुरूमहाराजाकडून,
द्यायचा होता कठोर शाप, दाभोलकरांच्या सत्यानाशासाठी...
धारेचा लिंबू अर्धवट कापून,टाकायचा होता बिबव्याचा उतारा,
दाभोलकरांच्या वाटेवर,त्यांच्या नेत्रात फुल पाडण्यासाठी,त्यांची वाचा बंद करण्यासाठी...
श्रध्देने लटकावयाची होती काळी बाहुली,तुमच्या शाखेच्या बाहेर
आणि आरपार खुपसायच्या होत्या सुया,बाहुलीच्या अंगभर,दाभोलकर समजून...
हात जोडून,डोळे झाकून करायचा होता नवस,
एखाद्या कोट्याधिश देवस्थानाला
पावलापावलावर उभे करायचे होते मठाश्रम,
गावागावात,वस्तीवस्तीत भरवायचे होते सतसंग,
आणि खुशाल करायचे होते, दाभोलकरांना पाखंडी सैतान म्हणून घोषित...
आमची ना नव्हतीच कधी
आज मात्र तुमचं कावरंबावरं थोबाड, ओरडून ओरडून सांगतय
तुम्ही हे सारं करून थकला, मणक्याचं टिचं भरल्यागत वाकला
पण यातली कोणतीच मात्रा दाभोलकरांवर लागू होईना
काही केल्या दाभोलकरांचं बंड तुम्हाला रोखता येईना.......
दाभोलकर ऊन,पाऊस वारा पीत,ओठी घेऊऩ समतेचं गीत,
प्रत्येकाच्या डेक्यातला अंधार झाडत,मस्तकातले धर्मांध किडे काढत,अंधश्रध्देची भुते गाडत..
अहोरात्र चालत राहिले, काळोखाच्या साम्राज्यात उजेड पेरत
मसणवट्यापासून भोंदूच्या मठापर्यंत,एक गांव एक पाणवठ्यापासून
जातपंचायतीच्या उच्चाटनापर्यंत, दाभोलकर अखंड लढत राहिले, ......पण....
अंधारातल्या सनातनी दुतांनो
तुमच्या बुवाबाजीला, तुमच्या कावेबाजीला,
तुमच्या मांत्रिकाला ,तुमच्या तांत्रिकाला, तुमच्या सुईला, तुमच्या बिब्याला,
तुमच्या ज्योतिषाला,तुमच्या पंचांगाला,तुमच्या अंगा-याला,तुमच्या धुपा-याला,
तुमच्या अधर्माला,तुमच्या कुकर्माला
क्षणभरही विचलीत करता आलं नाही, दाभोलकरांच्या विजिगिषू ध्येयवादाला,
तुमच्या तथाकथित अध्यात्मिक शक्तिने कणभरही मारता आलं नाही
नरेंद्र दाभोलकर नावाच्या विचाराला, अंतिमत: ....
पराभूत होऊन तुम्हाला टेकावे लागले गुडघे,...दाभोलकरांसमोर...
म्हणूनच तुम्ही वापरलं इतिहासाच्या ठेवणीतलं ब्रह्मास्त्र,
जे आधी माखलं होतं चार्वाक-तुकारामाच्या रक्तानं,
जे आज तुम्ही भिजवलय पुन्हा दाभोलकरांच्या रक्तात,
हा तुमच्या कुकर्माचा लेटेस्ट अध्याय, आणखी एक कलंकित कडी....
रक्ताच्या थारोळ्यात पडलाय, 20 ऑगस्ट2013,फुटपाथच्या कडेला,....पण...
अंधाराच्या सनातनी दुतांनो, मी तुरूंगातून बघतोय तुमच्या पराभवाची नांदी....आणि
अपराजित दाभोलकर......
सचिन माळी(ऑर्थर रोड जेलमधून)

Saturday, September 7, 2013

गणपती

गणपती मुळचा कोण???
गणपतीच्या जन्मासंबंधी आणि एकुण
अस्तित्वासंबंधी काही प्रश्न-
जर शंकर देव होता तर
त्याला गणपतीचे शीर धडावेगळे
करण्याआधी हे कळाले
नाही का की हा आपला पुत्र आहे.
जर गणपती देव होता तर
त्याला कळाले
नाही का की ज्याला आपण अडवतोय
हा तर आपला बाप आहे.
शंकराला हे कसे माहित नव्हते
कि आपली पत्नी गरोदर आहे?
बरे जर पार्वतीने
गणपतीला मळापासुन बनवले होते तर
ती असे किती दिवस
बिना आंघोळीची राहीली कि ज्यामुळे
तिच्या शरिरावर इतका मळ
साचला होता?
गणपतीचे शिर धडावेगळे केल्यावर
त्याचे मुंडके जोडण्यासाठी हत्तीचे
मुंडके का घ्यावे लागले?
तेव्हा पार्वतीच्या मळाचा EFFECT
चालला नाही का?
जिवन-मृत्युचे शाप-उःशाप
देणर्या शंकराची शक्ती इथे कुठे
गेली होती?
कृतयुगात श्रीगणेशाचे वाहन सिंह
होते आणि त्याला दहा हात होते.
त्रेतायुगात त्याचे वाहन मोर
आणि सहा हात, द्वापारयुगात त्याचे
वाहन मूषक म्हणजे उंदीर आणि चार
हात होते जर प्रत्येक युगात
तो स्वतःचे हात स्वतः कमी-जास्त
करत होता तर जेव्हा त्याचे मुंडके
छाटले गेले तेव्हा त्याने ते स्वतःहुन
का नाही निर्माण केले?
म्हणजे स्वतःच्या मुलाचे प्राण
वाचवण्यासाठी शंकर-पार्वतीने
एका मुक्या प्राण्याचा जिव
घेतला का?
आणि अशा प्राणीहत्येतुन
जन्माला आलेल्या गणपतीला मंगलमु
सुखकर्ता म्हणावे तरी कसे?
शिव पुराणानुसार पर्वतीने
बनवलेल्या मळाच्या गोळ्यावर गंगेचे
पाणी पडले आणि गणपतीचा जन्म
झाला.
ब्रम्हवैवर्त पुराणात तर कहरच
आहे- पार्वती तो गोळा ब्रम्हदेवाकडे
घेऊन जाते आणि तो जिवंत
करण्याची विनंती करते, त्यावर
ब्रम्हदेव
आपल्या विर्याचा शिडकावा मारतात
आणि त्या गोळ्याचा गणपती होतो.
मग
गणपती शंकराचा की ब्रम्हदेवाचा?
गणपती विवाहित असून
ऋद्धी आणि सिद्धी या ब्रम्हदेवाच्य
बायका आहेत म्हणजे
ब्रम्हदेवाच्या विर्यापासुन जन्म
घेतल्यावर सुद्धा गणपतीने
आपल्याच बहिंनींसोबत कसे काय
लग्न केले?
सौगंधीका परिनया या संगित
सुत्राच्या तिसर्या अध्यायात तर
गणपतीचा उल्लेख काम-
वासनेचा असुरांमधला सहावा असुर
असा आहे.
मग अशा ना धड माणुस ना धड
जनावर अशा चित्र-विचीत्र
CHARACTER ला देव म्हणावे
आणि मानावे तरी कसे?
शैलेश कुंटे यांच्या पोष्ट वरून copied