Thursday, November 14, 2013

हृदयस्पर्शी कथा

कॉलेजमध्ये,कट्ट्यावर जिकडे पहावे तिकडे एकच नाव
होतं श्रुती आणि राम. असणारच ना कारण
त्या दोघांचं एकमेकांवर तेवढं
प्रेमही होतं.श्रुती दिसायला इतकी सुंदर
जणू
देवाच्या हातातील कलाकृतीचा एक
सुंदर
नमुना आणि राम म्हणजे दिसायला जेमतेम पण
क्षणार्धात मन जिंकून घेणारा त्यामुळे
त्यांची जोडी चांगलीच
जमली होती.
एके दिवशी दोघांनी मिळून
महाबळेश्वरला फिरायला जाण्याच
ठरवलं,ठरल्याप्रमाणे दोघही महाबळेश्वरला गेले
खूप-
खूप एन्जॉय केला आणि परत घराकडे
जाण्यासाठी बसस्थानकाकडे आले.
श्रुतीला तिथे
गरम-गरम भेटणारे खारे शेंगदाणे खूपच आवडत असत
म्हणून तिने रामकडे शेंगदाणे
आणण्यासाठी हट्ट
धरला मग रामनेही तिचा हट्ट पुरवला व
गाडी पुन्हा परतीचा प्रवास करू
लागली पण
श्रुती गाडीत
रामची जाणूनबुजून थट्टा करत
होती मग
अचानक ती म्हणाली "ए राम तू जर
शेंगदाणे
विकणारा असतास तर किती छान झालं असतं
रे,मी लगेच तुझ्याशी लग्न केलं
असतं "
रामही तिला हसून हसून प्रतिसाद देत
होता आणि हसता हसता प्रवास
कधी संपला दोघांनाही कळलच
नाही त्यानंतर बरेच
दिवस सुखात गेले,पण एक त्यादिवशी राम
जेव्हा कॉलेजला आला तेव्हा श्रुतीची एक
मैत्रीण
रामकडे एक चिट्ठी देऊन गेली,त्याने
ती चिट्ठी वाचली अन
त्याच्या काळजात चर्रर्र
झालं,डोक्यात मुंग्या आल्या ,त्याला अंगातून प्राण
गेल्यासारख वाटत होतं त्या चिट्ठीत
श्रुतीने लिहल
होतं कि 'सॉरी राम माझं लग्न ठरल
आहे,मी माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊ शकत
नाही कृपया माझा शोध घेऊ नकोस…
आणि खरच
तसच झाल होत
श्रुतीला तिच्या घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे
लग्न
कराव लागलं होत आणि त्यांचं कुटुंब दूर कुठे
तरी निघून गेल होत.इकडे रामही ते
शहर सोडून कुठे
तरी निघून गेला होता...कुठे ? कुणालाच माहित
नव्हत…???
इकडे पाच वर्षात श्रुतीचा संसार आता चांगलाच
फुलला होता. त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस
महाबळेश्वरला साजरा करण्याचा तिच्या पतीने
ठरवलं
होतं,ठरल्याप्रमाणे सगळे महाबळेश्वरला गेले खूप
थाटामाटात वाढदिवस साजरा झाला अन मग सगळे
पुन्हा परत जाण्यासाठी निघाले पण तेवढ्यात
श्रुतीला तिचे आवडतीचे ते गरम
गरम खारे शेंगादाणे
खाण्याची इच्छा झाली म्हणून
गाडी बसस्थानकाकडे
नेण्यात आली.
गाडीमधून उतरून ती कुठे शेंगादाणे
विकणारा दिसतोय
का ते बघू लागली दूर एका कोपऱ्यात सायकलवर
आगेच ते धगधगत मडक घेऊन अतिशय कृश
झालेला दाढी वाढलेला एक माणूस शेंगदाणे
विकताना तिला दिसला ती धावत पळत त्याच्याकडे
गेली आणि त्याला दहा रुपयाची नोट
दिली आणि शेंगादाणे घेण्यासाठी हात
पुढे केला तर
अश्रूचा एक थेंब तिच्या तळहातावर पडला तिने वर
बघितलं तर तो शेंगदाणे
विकणारा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून
राम
होता तो …तिचा प्रियकर राम…तिला धक्काच
बसला होता, ती त्याला म्हणाली 'हे
अस कस
झालं ??' अश्रूचा एक अवंढा गिळत त्याने उत्तर
दिलं, की "श्रुती तूच
एकदा म्हंटली होतीस
ना की तू
शेंगदाणे विकणारा असतास तर
मी तुझ्याशी लगेच
लग्न केलं असत" सांग ना करणार
ना माझ्याशी लग्न….?? बघ
ना झालो ना मी आता शेंगादाणे
विकणारा आता तरी करणार
ना माझ्याशी लग्न…??तो अस म्हणताच
तिच्याही अश्रूंचा बांध तुटला पण स्वतःला सावरत
ती तशीच गाडीकडे
पळाली,गाडीत
बसली,अन
गाडी भरघाव निघून गेली.
अन तो तिथेच ती निघून गेलेल्या वाटेकडे
भरलेल्या डोळ्यांनी हातात शेंगादाणे घेऊन टक
लाऊन
बघत उभा होता.

Saturday, November 9, 2013

सोने आणि लोखंड

एक सोनार होता.
त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे
दुकान होते.
सोनार जेव्हा काम करत असे
तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज
होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे
तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने
मोठा आवाज होत असे.
तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके
दिवशी सोनाराच्या दुकानातील एक
सोन्याचा कण कसा कोण जाणे पण
लोहाराच्या दुकानात जावून पडला.
त्या सोन्याच्या कणाची भेट
एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप
दिवसांची ओळख असल्यासारखे ते
एकमेकांशी बोलू लागले.
सोन्याच्या कणाने
लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले
दुःख तर खरे एकसमान आहे.
दोघानाही आगीत तापवले जाते
आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर
बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे
काय?"
लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून
दुःखी स्वरात म्हणाला," अरे तुझे म्हणणे
अगदी बरोबर आहे.
दोघानाही तापवणारी आग एकच आहे
आणि ठोकणारा हातोडाहि एकाच
धातूचा आहे.
पण खरे दुःख याचे आहे कि
तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच
लागत नाही पण
मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने
माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने
दिलेल्या दुःखापेक्षा "
स्वकीयांनी दिलेला त्रास
हा अगदी हृदयात वार करून जातो.....