Monday, February 24, 2014

संत गाडगे महाराज - बुद्धीप्रामाण्यवाद - अंधश्रद्धा निर्मुलन



महाराष्ट्रातील अलीकडच्या काळातील संतांमधील शेवटची कडी म्हणजे संत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज. तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता नावाचा अतिशय सुंदर ग्रंथ लिहिला या माध्यमातून अतिशय सुंदर व्यावहारिक ज्ञान त्यांनी लोकांपर्यंत पोहचविले. तुकडोजी महाराजांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती व व्यसनमुक्ती केली हे आपण प्रामुख्याने वाचत व ऐकत आलो आहोत.

मित्रांनो - मला जास्त आकर्षित करून घेणारा संत म्हणजे गाडगे महाराज. खर म्हणजे परीटाच्या / धोब्याच्या घरात जन्म झालेला हा मुलगा दुसऱ्या वर्गाचेही शिक्षण त्याला प्राप्त झालेले नाही ह्या अर्थाने त्याला खरे तर अशिक्षित म्हटले पाहिजे. ह्या माणसाने अत्यंत ताकदीने महाराष्ट्राला बुद्धीप्रामाण्यवाद दिला जनसामान्यांपर्यंत तो ताकदीनं पोहोचवला ही फार महत्वाची गोष्ट आहे.

खरं म्हणजे संत गाडगे महाराज यांनी नवी परंपरा निर्माण केली गाडगे महाराजांचे वैशिष्ट्य असे होते की हा माणूस आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये कुणालाही पाया पडू देईना. जेंव्हा लोक संत म्हणून त्यांच्या पाया पडायला यायचे तेंव्हा हे त्याना काठीने मार द्यायचे आणि म्हणायचे -
' माझ्या पाया तुमी कायले पडता त्यापेक्षा आपल्या आई बापाच्या पाया पडा !'
मित्रांनो - अतिशय निस्पृह वृत्तीचा हा थोर माणूस होऊन गेला आहे !

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एक इंग्लंडची नौका पाण्यामध्ये बुडाली होती आणि कल्पना अशी होती की इंग्लंडने आपल्या देशातील सर्व सोनं भारतामध्ये पाठवण्यासाठी या नौकेचा वापर केला होता. आणि युद्ध काळात ही नौका बुडाली आणि भारताच्या जवळच समुद्रामध्ये तळाशी ते सर्व सोनं गेलेलं आहे ह्या अफवेचा फायदा घेवून गाडगे महाराज जनतेचे प्रबोधन करायचे. प्रबोधन करत असतांना सत्यनारायनाचा उल्लेख करायचे. आता सत्यनारायण हा भारतीय आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रीय माणसांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला आहे. त्याला धर्माचा भाग मानून प्रत्येकजण सत्यनारायण करतांना दिसतो. घरी लग्न असलं की -सत्यनारायण मुलाच लग्न -सिंगल सत्यनारायण, मुलीचं लग्न -डबल सत्यनारायण, ह्या पद्धतीन हे सत्यनारायण चालतात एव्हढच नव्हे तर माझा एक व्यवसाइक इंजिनिअर मित्र प्रोजेक्ट चालू केला म्हणून - सत्यनारायण, पूर्ण झाला म्हणून सत्यनारायण. असे सत्यनारायण आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर होतांना दिसतात. गाडगे महाराज ह्या सत्यनारायण कथेचा उल्लेख करून म्हणायचे ( गाडगे महाराजांचे कीर्तन म्हणजे लोकांना एक मोठी पर्वणीच असे. ते लोकांपुढे उभे राहून लोकांशी संवाद साधत असत. लोकांना प्रश्न विचारत असत आणि प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये त्यांचे कीर्तन रंगत जात असे. लोकांना ते जाहीररित्या प्रश्न विचारायचे - )

'काउन रे तुमी सत्यनारायण करता ना ? मग सत्यनारायण केल्यावर पोथिमदे लिवलय ना - बुडालेली नाव वर येते ! मग आता सत्यनारायण कराव, जे आता इंग्लंडची नाव पाण्यात बुडाली, तीच्याव लई मोठ सोन है, अरे सत्यनारायण करा ते नाव वर काढा , आपल्या देशाच लई भलं होऊन जाइल !'
असं म्हटल्यावर लोक गप्प रहायचे कारण लोकांना माहित होत की सत्यनारायण करून नाव काही वर येणार नाही.

गाडगे महाराज या सत्यनारायनाच्या पोथिचा उल्लेख का करायचे हे समजून घेण्यासाठी ह्या पोथिकडे जरा पाहू - सत्यनारायण - अध्याय -४ साधुवाण्याचा

साधुवाण्याची मुलगी कलावती सत्यनारायण करत होती । एव्हढ्यात तिच्या कानी वार्ता आली । तिचा पती स्वगृही परत आलेला आहे । ती वार्ता ऐकताच ती तडक समुद्रकिनारी निघाली । सत्यनारायण अर्धवट सोडून , प्रसाद भक्षण न करता ती तडक समुद्रकिनारी धावत गेली । समुद्र किनारी जाउन पहाते तर तर काय तिचा पिता धाय मोकलून रडतो आहे । स्वत:चा उर बडवून घेतो आहे । … ती पित्याला विचरती झाली । बा तुंम्ही का रडता आहात । … यावर पिता उद्गारला , - हे कालाव्ते भरपूर धन धान्य आणि संपत्ती घेवून मी इथवर आलो । माझ्यासमवेत तुझा पती म्हणजे माझा जावई होता । मी खाली उतरलो , तुला निरोप पाठवला आणि बघता बघता संपूर्ण जहाज पाण्यामध्ये बुडालं । त्यासोबत सारी धनसंपत्ती पाण्यात बुडाली । एव्हढंच नव्हे तर तुझा पती माझा जावई पाण्यात बुडाला । बराच कालावधी झाला तरी तो वर आलेला नाही । त्यामुळे तो मृत झाला अस मला वाटत । आणि जावई वियोगाच्या दु:खान मी उर बडवून घेतो आहे । … हे कलावती ऐकताच पती वियोग झाला अस तिला कळलं । तिलाही अतीव दु:ख झालं । तीही धाय मोकलुन रडू लागली । स्वत:चा उर बडवून घेऊ लागली । …. तेवढ्यात आकाशवाणी झाली …. ( मित्रांनो तेंव्हा आकाशवाणी एकच होती आज सारखी मुंबई केंद्र, पुणे केंद्र अशी नव्हती ) …. हे कालावते तू रडून उपयोग नाही । धाय मोकलून उपयोग नाही । कारण तू सत्यनारायण देवाचा कोप ओढवून घेतला आहेस । पतीची वार्ता ऐकताच तू पतीप्रेमापोटी सत्यनारायण अर्धवट टाकलास । प्रसादसुद्धा भक्षण न करताच तू समुद्र किनारी गेलीस । त्यामुळे सत्यनारायण देवांचा अपमान झाला । त्यामुळे सत्यनारायण देव अत्यंत क्रोधीत झाले । आणि त्यांनी जहाजच्या जहाज तुझ्या पतीसमवेत पाण्यात बुडवलं । तुला जर तुझा पती परत हवा असेल तर साग्रसंगीत सत्यनारायणाची पूजा कर । सात्यनारायाणाला प्रसन्न करून घे । त्यानंतर तुझा पती तुला परत मिळेल.।……

( मित्रांनो - मला कळत नाही कलावती पतीप्रेमापोटी सत्यनारायण सोडून धावत गेली असेल , राहिली पूजा अर्धवट, काय बिघडलं? दोघही परत आले असते मग दोघांनी ही मस्त जोड्याने हाताला हात लाऊन पूजा केली असती ……पण नाही … मला सोडून कशी काय नवऱ्याकडे चालली … बुडव त्याची नाव … असला हा आपला देव ! … असा कसा देव असू शकेल ? त्याला एव्हढा राग ? सवता आहे का ? या पद्धतीने आपण जर विचार केला तर यातील विरोधाभास आपल्या लक्षात येईल.)

… हे ऐकल्यानंतर कलावतीने डोळे पुसले । ती स्वत:च्या घरी आली घरी आल्यावर तिने साग्रसंगीत सत्यनारायणाची पूजा केली । त्यानंतर अतिशय भक्ती भावाने प्रसाद भक्षण केला …. आणि पहाता पहाता समुद्रात बुडालेली नाव वर आली, एव्हढंच नव्हे तर समुद्रात बुडालेला नाका तोंडात पाणी गेलेला तिचा पती जिवंत वर आला. तिची बुडालेली सर्व धनसंपत्ती परत मिळाली । … हे आपण सार ऐकतो, नंतर सत्यनारायण देवाला भक्तिभावाने हात जोडतो. आणि म्हणतो हे सत्यनारायण देवा जसं कलावतीला तीच बुडलेल सर्व मिळाल तस आम्हालाही आमच बुडालेल सारं आम्हाला मिळवून दे !. या पद्धतीन सत्यनारायणाची पूजा गावोगाव चालत असते.

या सत्यनारायण कथेचा उपयोग करून गाडगे महाराज विचारायचे - अरे पोथीत लिवलय ना , सत्यनारायण केला की नाव वर येते ? मंग आता करा सात्यनारायण आणि बुडालेली नाव वर काढा ! आपल्या देशाला लई सोनं भेटन ! देशाच भलं होऊन जाइल ! … ह्यावर लोक गप्प बसायचे. मग ह्या गप्प बसलेल्या लोकांना गाडगे महाराज डिवचून म्हणायचे -

'काउन रे एका सत्यनारायणान होत नाही काय ? मंग दहा दहा सत्यनारायण घाला ! धा सत्यानारायनान होत नसन तर दहा हजार सत्यनारायण घाला ! इथून सत्यनारायण पावत नसन तर ममैय (मुंबई) च्या समुद्राजवळ जा … पैसे मी देतो … तिथ सत्यनारायण करा पण बुडालेली नाव वर काढा !' अस म्हटल्यावर लोक गप्प बसायचे … मग चिडल्याचा आविर्भाव आणून म्हणायचे - ' दहा हजार सत्यनारायण घालून जर ते नाव वर येत नायी ! तर कायले ती खोट्टारडी पोथी वाचता ? कायले तो खोट्टारडा सत्यनारायण करता ? आणि वरून त्याले सत्यनारायण म्हणता ?' … वरून ते असही म्हणायचे - 'चालले बह्याड बेल्हे , सत्यनारायण करायले ! '

मित्रांनो मी तुम्हाला अस म्हणणार नाही की तुम्ही सत्यनारायण करू नका ! पण मित्रांनो दुसरी इयत्ता ही न शिकलेल्या माणसाचे एक वाक्य लक्षात ठेवा - 'चाल्ले सारे च्या सारे , बह्याड बेल्हे , सत्यनारायण करायले !'

मित्रानो - गाडगे महाराजांचे आणखी एक वैशिष्ट्य होते की त्यांनी जिथे जिथे यात्रा होतात त्या सर्व ठिकाणी ते जायचे. गरिबांच्या खाण्या पिण्याची सोय करायचे मित्रांनो गरीब लोकांना रहाण्यासाठी अशा ठिकाणी सोयी नसतात म्हणून त्यांनी ठीक ठिकाणी अनेक धर्मशाळा काढल्या अशा शेकडो धर्मशाळा बांधणारा माणूस, अनेक शाळा बांधणारा माणूस, अनेकांना फुकट खाऊ घालणारा माणूस, मंदिरामधून लोक नदीच्या पात्रामध्ये स्नानाकरिता उतरतात, पाय घसरून पडतात, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी घाट बांधले. परंतु एकही मंदिर त्यांनी बांधले नाही. गाडगे महाराज कधीही मंदिरात देवाच्या दर्शनाला गेले नाहीत. कारण - गाडगे महाराज माणसामध्ये देव पहाणारे माणूस होते.

गाडगे महाराज लोकांना विचारायचे -

काउन रे तुमी देव मानता का नाय ?
लोक म्हणायचे - हो जी ! आमि देव मानतो !
अरे मी बी देव मानतो ! माहा देव माझ्या मनात असते ! तुमचा देव कुठ र्हायते रे ?
लोक म्हणायचे 'आमचा देव देवळात र्हायते !'
अरे तुमच्या देवळातल्या देवाला धोतर असते का न्हायी ?
लोक म्हणायचे - 'हो जी असते !'
मंग तुमच्या देवळातले देवाले धोतर कोन नेसवते रे ?
लोक म्हणायचे- 'आमीच नेसवतो जी !'
काउन देवाले धोतर नेसता येत नाय काय ?
त्यावर लोक म्हणायचे- 'नाय जी नाय नेसता येत !'
अरे व्वा रे व्वा तुमचा देव ! ज्या तुमच्या देवाले सोताच धोतर नाय नेसता येत , तो तुमाला काय नेसवणार रे ? …
…( या पद्धतीचे प्रश्न विचारून माणसांना ते विचार करायला प्रवृत्त करत.)
पुढे ते म्हणत - काय रे देवाला निवद दाखवता का नाय ?
लोक म्हणायचे - 'हो जी दाखवतो !'
मंग काय करता ?
लोक म्हणायचे - हातात काठी घेवून बसतो !
कायले काठी घेवून बसता ?
लोक म्हणायचे- नाय मंजे ते कुत्र येते, मांजर येते त्याले हाकलाय लागते न व !
अरे वा रे वा तुमचा देव ! तुमच्या देवाले सोताच्या निवदावरच कुत्र न मांजर हाकलता येत नाय तो तुमचं गंडांतर काय हाकलणार रे ?
(या पद्धतीने ते लोकांना विचार करायला भाग पाडत असत समजावत असत ! )

एवढच नव्हे तर ज्या ठिकाणी बळी दिले जात अशा ठिकाणी गाडगे महाराज जात. लोक तिथे कोंबडी बकरी कापत असत बाजूला त्यांची मुले असत बहुदा मुलांसंदर्भात नवस फेडणे असे. तिथेही उभे राहून गाडगे महाराज लोकांना प्रश्न विचारत -

'काय करून ऱ्हायला रे ?'
'न्हायी जी नवस फेडून राहिलो, म्या म्हन्ल माह पोरग ठीक झालं की कोंबड कापीन !'
'अरे कोंबड कुनाच लेकरू हाय ?'
'देवाचच लेकरू हाय !'
'आन तूह लेकरू ?'
'माह व्ह्य ना जी !'
'आन तू कोनाचा रे ?'
'मी माह्या बापाचा न जी !'
'म्हन्जे शेवटी कोनाचा ?
'देवाचं लेकरू !'
'मंग तूह लेकरू बी देवाचच न ?
'हो जी !'
अरे तूच त म्हनते कोंबड बी देवाचं लेकरू आणि तूह बी देवाचं लेकरू . आणि आताच मला सांगत होतास की कोंबड कापलं की देव प्रसन्न होते तूह पोरग बी देवाचं लेकरू है … काप त्याले आणि घे देवाले प्रसन्न करून ! … असं म्हटल्यावर लोकांच्या अंगावर शहारे येत असत आणि त्यांना कोंबड कापायची हिम्मत देखील होत नसे.

गाडगे महाराज पंढरपूरच्या यात्रेत प्रबोधनासाठी जायचे -
अरे संत ज्ञानेश्वरांनी , तुकारामांनी सांगितलेय देव माणसात असते , तरी तुमी हित आले … देव चरा - चरात आहे अस म्हनता …. आणि चंद्रभागेत आंघोळ करून हित वाळवंटात लोटे घेवून बसता …सगळ वाळवंट घाण करून टाकता …हे साफ कोण करणार रे ? … ते विठोबाचे हात कमरेवर हैत .. तुमचे पण हात कमरेवर हैत .. ते कमरेवरचे हात काढा .. हातात झाडू घ्या .. माझ्यासोबत हे वाळवंट झाडून काढा ..अस म्हणणारे गाडगे महाराज लोकांना स्वच्छतेच आणि आरोग्याचे महत्व लोकांना पटवून सांगायचे. आणि म्हणायचे -

देवळात देव नसते, देव माणसाच्या मनात र्हायते !
ज्या मानसाले खायला भेटत नसन त्याले खायला द्याव !
ज्याले शिक्षण नसन त्याले शिक्षण द्यावं !
ज्याले आसरा नसन त्याले आसरा द्यावं !
देव माणसाच्या मनात राह्यते, देवळात रहात नायी, देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट र्हायते !
मित्रांनो - हा ताकदीचा बुद्धीप्रमाण्यवाद आपण समजून घेतला पाहिजे.
चमत्कार होत नाहीत असे सांगणारे गाडगे महाराज लोकांच्या /महिलांच्या अंगात देव्या येण्यासंमंधी म्हणायचे -
'अरे हिच्या अंगात देवी येते सात सात दिवस आंग नाय धूत आनि हिच्या अंगात देवी येते काय देवीला काम धंदा नाय काय रे ? घूस हिच्या अंगात घूस तिच्या अंगात !

या पद्धतीन अत्यंत ताकदीन बुद्धिप्रामाण्यवाद मांडणारे चमत्कारांना विरोध करणारे संत गाडगे महाराज १९५६ साली वारले. उमाळेगुरुजी (बी.ए.बी.टी.) यांनी गाडगे महाराजांवर पोथी लिहिली. या पोथीमध्ये गाडगे महाराजांनी भरपूर चमत्कार केले आहेत. असे वर्णन पोथीमध्ये जागो जागी पहायला मिळते - गाडगे महाराज सदेह कीर्तनातून अंतर्धान पावत असत -- गाडगे महाराज तुकारामाचा अवतार आहेत -- खरा कळस तर -गाडगे महाराजांसाठी वैकुंठातून पुष्पक विमान आले आणि गाडगे महाराज त्यात बसून वैकुंठात निघून गेले अस लिहिलेली पोथी १९८३ साली लिहिली जाते.
ज्या गाडगे महाराजांना पाहिलेली, त्यांचे कीर्तन ऐकलेली, त्यांच्या अंत्ययात्रेत सामील झालेली माणसे आजही असतांना,प्रबोधनकार ठाकरें सारख्यां व्यक्तीने त्यांचे चरित्र लिहिले आहे. अशा गाडगे महाराजान्बधल अशा स्वरुपाची पोथी १९८३ साली अवघ्या ३० ते ४० वर्षात लिहिली जाऊ शकते मग ३५० वर्षापूर्वीचे संत तुकाराम ७०० वर्षापूर्वीचे ज्ञानेश्वर अशा अनेक संतांचे आम्ही काय करून ठेवले असेल ? विचार करा मित्रांनो !

सं/ले. - विवेक घाटविलकर

Wednesday, February 5, 2014

बुवा तेथे बाया ! 

जिवंत हृदयाच्या शाबूत डोक्याच्या मित्र मैत्रिणींनो - 
मित्रांनो … आचार्य अत्रेंचे एक वाक्य अतिशय प्रसिद्ध आहे 'वृक्ष तेथे छाया बुवा तेथे बाया !' हे वाक्य ऐकल्यावर सुरुवातीस असे वाटायचे की अत्र्यांचा हा उगाचच केलेला आगावूपणा आहे. असतील काही बाबा, बुवा,बापू असे पण सगळेच असे नसावेत. पण ह्या वाक्याची सत्यता चळवळीच्या अनुषंगाने, डोळस अनुभवाने पटत गेली, दृढ होत गेली. 
(काही मोठ्या प्रमाणावर भांडाफोड प्रसारित झालेल्या उदा. सह मांडणी करण्याचा मी प्रयत्न करत आहे ) 

* विद्यानंद महाराज (वर्धा) - खरे तर विवेकानंदांचे तत्वज्ञान सांगणारे हे बाबा. या बाबाच्या नागोबा अंगात येत असे आणि 'विठुलाचा खेळ' नावाखाली हा बाबा स्त्रियांशी संबंध प्रस्तापित करत असे. या बाबाचे खरे नाव चंद्रशेखर जोशी. दहावी नापास असलेला हा माणूस अमेरिकेत (एम. डी. एफ. आर. सी. एस.) डॉक्टर होतो, पण साक्षात्कार झाल्याने पुंन्हा विदेशातील practice सोडून भारतात लोकांचे कल्याणाकरिता आलो असे सांगत असे. …।
मित्रांनो - माणूस कधीही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये भेद करत नाही. कारण त्याला प्रत्यक्षामध्ये हा भेद करताच येत नाही. कारण श्रद्धेच्या बाबतीत चार इन्क्रिडीयंट सांगितले जातात.
(१) ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याला सर्वश्रेष्ठ मानणे.।
(२) ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याचे शब्दप्रामाण्य मानणे (शब्द प्रामाण्य म्हणजे शब्द हेच प्रमाण -उदा . - एखादा बाबा म्हणाला कि मी स्वर्गात जाउन आलो कि आपण त्यावर विश्वास ठेऊन बाबा स्वर्गात जाउन आले असे मानणे )
(३) ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याच्यावर शंका न घेणे. 
(४) ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्या विषयी चिकित्सा न करणे. 
मित्रांनो असे चिकित्सा न करता तुंम्ही शब्दप्रामाण्य मानून व्यक्ती,वस्तू,ग्रंथ यावर श्रद्धा ठेवायला लागलात तर श्रद्धेचे रुपांतर अंधश्रद्धेत कधी होते ते लक्षात येत नाही. 
खरे तर समोरील माणसाला श्रद्धा बाळगणाऱ्या माणसातील अंधश्रद्धा दिसत असते. पण त्याला स्वत:ला तो शब्दप्रामाण्य मानत असल्यामुळे चिकित्सा करत नसल्याने ती अंधश्रद्धा वाटत नसते. त्यामुळे मित्रांनो श्रद्धा आणि अंधश्रद्धा एकच आहेत.
काही लोक म्हणतात डोळस श्रद्धा ठेवली पाहिजे, म्हणजेच बदलू शकेल अशी श्रद्धा - खर म्हणजे डोळस प्रकारची श्रद्धा असू शकत नाही - पण हेही खरे आहे की विश्वासाशिवाय माणसाला जगताच येणार नाही. - अनुभव बदलला कि विश्वास बदलतो पण या प्रक्रियेला श्रद्धा या प्रक्रियेत स्थान नाही. अनुभव बदलला कि विश्वास बदलू शकतो. त्याला कुणाचा विरोध असण्याचे कारणच नाही आणि म्हणून श्रद्धा या शब्दाविषयी आपण भांडत नाही. 
समाजामध्ये आपल्याला श्रद्धा या प्रक्रियेचा वापर करून माणसे मोठ्या प्रमाणावर इतरांना कशा प्रकारे लुबाडत असतात हे प्रकर्षाने दिसते. ।
मित्रांनो अंनिस च्या चळवळीने हजारो बाबा, बुवा, बापू, मांत्रिक यांची भांडाफोड केलेली आहे. या सर्व भांडाफोड झालेल्या प्रकरणांचा अभ्यास केल्यास असे कळते कि जो जो माणूस स्वत: स्वामी, बाबा म्हणवतो जो जो स्वत:मध्ये दैवी शक्ती आहे असा आभास निर्माण करतो तो तो प्रत्येक बाबा अनेक स्त्रियांचा वापर करीत असतो.
*मनमाड जवळील शुकादास बाबा : - स्वत:ला देव अवतार म्हणवणारा काही इयत्ता शिकलेला हा माणूस एका डॉक्टरकडे काम्पौडर होता. त्या अनुभवाच्या जोरावर हा लोकांना बाबागिरी सोबतच औषधाच्या प्रीक्सिप्षनही लिहून देत असे. पुरुषांची तपासणी दोन मिनिटात तर स्त्रियांसाठी लागणारा वेळ हा पाच मिनिटांपासून अर्धा पाउण तास इतका असे. एका जागरूक महिलेच्या तक्रारीवरून आपल्या कार्यकर्त्यांना या बाबाची भांडाफोड करण्यात यश मिळाले होते. तक्रारीनंतर कार्याकर्त्यांजवळ पिडीत महिलांची १००च्या पुढे लिस्ट गेली होती. त्यातील २० ते २५ महिला फोडण्यात समितिला यश आले. व अनेक पुरावे गोळा होऊ शकले. हा शुक्दासबाबा महिलांना एकांतात मी कृष्णाचा अवतार आहे आणि तू गेल्या जन्मीची माझी राधा किंवा आवडती गोपी आहेस, असे सांगून त्यांच्या मनातील गिल्ट (अपराधीपणाची भावना) काडून टाकत असे आणि त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करत असे. मित्रांनो या बाबाचा दरबार अनेक ठिकाणी लागत असे,यामुळे गोपिकांची संख्या देखील वाढली होती. त्यामुळे अनेक गोपिकांचे नंबर या बाबाकडे लागेनासे झाले. त्यातून त्यांची आपापसात कुरबुर वाढून मारामारीपर्यंत वेळ आली होती आणि याचा फायदा चळवळीला झाला समिती त्यांना फोडू शकली आणि मोठ्या प्रमाणावर शुकदासबाबाची भांडाफोड शक्य झाली. 
*गुलाबबाबा (काटेल - वर्धा) - मित्रांनो हा हि कृष्णावतार … हा बाबा अनेक मुलींना माय संबोधून त्यांच्याशी लहान बाळाप्रमाणे वर्तन करीत असे पुढे संबध प्रस्तापित करीत असे. - ह्याही बाबाला मोठ्या प्रमाणावर एक्स्पोज करण्यात कार्यकर्त्याना यश आले होते. 
मित्रांनो ज्या ज्या बाबा/बुवांना चळवळीने एक्स्पोज केले होते त्यातील अधिकाधिक बाबा श्रीकृष्ण नावाच्या देवाचा अतिशय वाईट पद्धतीने वापर करून घेत होते. ते सर्व केंव्हा ना केंव्हा आपल्या भक्तांना मी कृष्णावतार आहे आणि तू गोपी किंवा माझी आवडती राधा आहेस असे सांगून त्यांचा वापर सातत्याने करून घेतांना पुढे आले आहे. हे सर्व बाबापर्यंत मर्यादित नसून मांत्रिक, भगत, दीर्घकाळ जोतिशाचा धंदा करणारे लोक थोड्याफार वेगळ्या प्रमाणात हेच करतात हे लक्षात आले. 
*विधार्भातील सुंदरदास महाराज :- रामास्नेही पंथातील कोट्यावधी संपत्ती असलेल्या समाजातील हा महाराज - याच्याविरोधात अकोला,अमरावतीतील अनेक तरून मंडळी उभी ठाकली होती, परंतु त्यांना फारसे यश न आल्याने या मंडळींनी चळवळीची मदत घेवून या महाराजाला मोठ्या प्रमाणावर एक्स्पोज केले. या बाबाचे भक्त एव्हढे अंधश्रद्धाळू होते की आपल्या नव्या सुनेला देखील पहिल्या रात्रीकरीता सुंदरदासाकडे पाठवत असत. आणि त्याचा अभिमानही बाळगत असत. त्यांची श्रद्धा अशी होती कि त्याने सांगितल्याप्रमाणे हा बाबा दहाव्या मार्गातून मोक्ष मिळवून देतो. याला एक्स्पोज केल्यानंतर रामस्नेही पंथातील साधूंच्या मंडळासमोर या सुंदरदासाला विचारणा करण्यात आल्यावर त्याने अगदी छातीठोकपणे सांगितले की मी जो मार्ग सांगत आहे तोच खरा धार्मिक मार्ग आहे. कारण हा पंथ व्यापाऱ्यांचा आहे. या पंथातील पुरुषांना आपल्या स्त्रियांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो मग या स्त्रिया नोकरांशी संबंध ठेवतात त्यातून वर्णसंकर होतो त्यामुळे धर्माचे प्रचंड नुकसान होते. मी मात्र संबंध निर्माण करून त्या स्त्रियांना शपथ घालतो कि माझ्याशिवाय व तुझ्या नवऱ्याशीवाय कोणाशीही संबध ठेवायचे नाहीत व त्या स्त्रिया माझा शब्द कधीही तोडत नाहीत. त्यामुळे खऱ्या अर्थाने मी धर्म बचावाचे काम करतो आहे, वर्णव्यवस्था टिकविण्याचे काम करतो आहे.असा दावा सुंदरदासने त्या ठिकाणी केला. आणि कालांतराने दडपशाहीच्या जोरावर स्वत: त्या पंथाचा चीफ होऊन बसला. 
*कृपाळू महाराज :- याला अनाघ्रात स्त्री लागत असे आणि याचे अंधभक्त ते सर्व पुरवित असत. - भारतीय कायद्यानुसार वय १८ वर्षे वयाखालील मुलीवर असा प्रसंग झाल्यास तो बलात्कार ठरतो. -- ह्या संदर्भातील केस दाखल करून बरेच वर्ष हा बाबा नागपूर कोर्टाच्या वाऱ्या करत होता.
** मित्रांनो असं का घडत ? ज्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चारित्र्याचे स्तोम माजवले जाते, प्रत्येक स्त्रीने, मुलीने चारित्र्य संपन्न असावे असे मानले जाते. पुरुषांना थोड्या प्रमाणात सूट दिली जाते. पण स्त्रयांच्या मुलींच्या बाबतीत आग्रह कायम असतो. पुरुषाने काही प्रामाणात लग्नाआधी भानगडी केलेल्या चालतात. पण स्त्रीच्या बाबतीत खपवून घेतले जात नाही. प्रत्येक नवऱ्याला आपली पत्नी अनाघ्रात हवी असते. एव्हढेच नव्हे तर एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीची छेद काढली किंवा tonting केले तर बदडून अगदी गाढवावरून धिंड काढणे, हातपाय तोडण्यापर्यंत मजल जाते. त्या समाजात हे बाबालोक एव्हड्या मोठ्या प्रमाणावर कसे काय संबंध प्रस्थापित करू शकतात. ??? 

स्त्री-पुरुषांनी आयुष्यभर प्रामाणिक असावं केवळ विवाह या पद्धतीमध्येच या पद्धतीचे शरीरसंबंध निर्माण व्हावे वैवाहिक जीवनाबाहेर कधीही होऊ नयेत हि एक आदर्श कल्पना आपण आपल्या समाजामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला हि कल्पना समाजामध्ये राबवत असतांना पुरुषसत्ताक पद्धती असल्याने पुरुषांनी स्वत:ला मात्र स्वातंत्र्य खेचून घेतले व कायम ठेवले. त्यांना आपले स्वातंत्र्य राबवायचे असेल आणि स्त्रियांनी पूर्णपणे चारित्र्याची संकल्पना आमलात आणायची असेल तर स्वाभाविकच अशा स्त्रीया समाजामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत कि ज्या चारित्र्य बाळगणार नाहीत. त्यांच्यावर चारित्र्याचे बंधन असणार नाही. यातूनच वेश्याव्यवसाय यंत्रणेला सुरुवात झाली. आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय समाजामध्ये निर्माण झाला. हि जी दुहेरी नितीमत्ता आहे की स्त्रियांना वेगळी मोरलीटी आणि पुरुषांना मात्र त्या मोरालिटीमध्ये थोडी लवचिकता, यातून जशी स्त्री वेश्यांची निर्मिती घडते आणि ती समाजामध्ये अपरिहार्य ठरते त्याच पद्धतीने पुरुषवेश्यांची निर्मिती सुद्धा अपरिहार्य ठरते. कारण - लग्नसंस्थेतून हे प्रश्न सुटतातच असे नाही. एक तर भारतीय १००% पुरुषांना शरीरसंबंधातील ज्ञान असतेच असे नाही. अनेकांना असे वाटते की मुल होणे म्हणजे आपल्याला या संबंधी परिपूर्ण ज्ञान आहे. 
बाबा /बुवा यांच्याशी एंटेन्गल झालेल्या स्त्रीयांशी संवाद साधल्यावर त्या म्हणाल्या हे बाबा महाराज या बाबतीत खूपच प्रवीण असतात. आमची फसगत झाली पण त्यावेळी आम्ही परमानंदात होतो. मित्रांनो याचा नेमका अर्थ लक्षात घेतला पाहिजे. - 
भारतीय समाजामध्ये स्त्रियांना एका बाजूने सेक्सबद्धल चुकीच्या संकल्पना सांगितल्या जातात. त्याना हे सुद्धा सांगितल जात की सेक्समध्ये रुची वाटता कामा नये. बाईला केवळ प्रेमामध्येच रुची वाटायला हवी. थोडक्यात एक फ्रीजीडीटी निर्माण होईल कमी लैंगिक इच्छा निर्माण होईल या पद्धतीचा संस्कार स्त्रियांवर असतो. पुरुषसुद्धा कमी लैंगिक इच्छेची धारणा कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. स्वसमाधान पुरेसे मानतात. त्यातून सेक्ससंबंधी आवड निर्माण होण्याऐवजी कंटाळवाणा प्रकार या पद्धतीने पहाण्याचा कल स्त्रियांमध्ये वाढत जातो. या पद्धतीच्या स्त्रिया देवा धर्माच्या जास्त नादाला लागलेल्या दिसतात कारण मनामध्ये साचून राहिलेली भावना देवाधार्मासाराख्या क्रियांमधून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. भजन-कीर्तन करतात. देवाच्या आहारी जाण्याचा प्रयत्न करतात. आणि या पद्धतीच्या स्त्रिया देवाचा अवतार असलेल्या बुवांकडे अधिक मोठ्या संखेने खेचल्या जातात.
सर्वात पाहिलं काम बुवा कोणत करत असेल तर या स्त्रियांच्या मनातील गिल्ट कॉम्प्लेक्स काढून टाकतो. बुवा बाबांना हे सांगण्याची खर म्हणजे गरज नाही कि मी कृष्णावतार आहे व तू गोपी आहेस कारण - भारतीय समाजात स्त्रीला सहजपणे ज्याच्यापर्यंत पोहचता येते ते म्हणजे बाबा, बुवा, मांत्रिक,ज्योतीशी हे आहे. डॉक्टरकडे सुद्धा तिला सहजतेने जाता येत नाही. एखादा पुरुष डॉक्टर एखाद्या स्त्रीला जास्त वेळ आतमध्ये तपासत असेल तर बाहेर बसलेला पुरुष अस्वस्थ होतो. किंवा नातेवाइक अस्वस्थ होतात. पण बाबा, बुवांकडे तासंतास आहे तर यामध्ये पवित्रता आहे. यामध्ये देवाचं काहीतरी आहे. म्हणून माणसं नेहमी खुश होतांना दिसतात की माझी बायको फार मोठी धार्मिक आहे, ती बाबांची फार मोठी भक्त आहे. त्यामुळे स्त्रीला पुरूषांजवळ जाण्याची उत्तम संधी मिळत असेल तर ती असल्या बाबा,बुवा, मांत्रिक, ज्योतिषी या पद्धतीच्या पुरुशांजवळ जाण्याची त्यामुळे स्वाभाविकच यामार्गातून त्यांना रिलेशन निर्माण करता येतात. यामध्ये हे बाबालोक स्त्रियांच्या मनातील गिल्ट कॉम्प्लेक्स काढून टाकतात, राधाकृष्ण यासारखे संबंध जोडून यामागे वावगे काही नाही, हीच देवाची दिशा आहे, या संबंधातून केवळ तुझाच नव्हे तर तुझ्या कुटुंबाला सुद्धा मोक्ष मिळणार आहे असं सुंदरदास सारखा बाबा पटवून देण्यात यशस्वी होत असतो. एखादा मांत्रिक घरातील उद्भवलेल्या अडचणीपासून सुटका मिळण्यासाठी स्त्रीला आपल्याशी संबंध ठेवण्यास भाग पडतो. या प्रमाणे तांत्रिक कल्पनांच्या नावाखाली देवाच्या अवताराच्या नावाखाली किंवा गेल्या जन्मी तू कोणीतरी मी कोणीतरी होतो म्हणून याही जन्मी हरकत नाही, या पद्धतीची खेळी वापरून स्त्रियांच्या मनातील अपराधीपणाची भावना काढून टाकतात. या पद्धतीचा पुण्यामधील काही वर्षांपूर्वी मिसर नावाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी वाघमारेबाबा बाबत सखोल चौकशी करून वाघमारेबाबा प्रकरण बाहेर काढले होते.
मित्रांनो असे बाबा स्त्रियांच्या बाबतीत वीरपुरुष सिद्धपुरुष ठरतो. त्यानंतर ती स्त्री सातत्याने त्यात अडकत जाते. मित्रांनो वाईट भाग हा आहे कि हे सगळ धर्म आणि श्रद्धा या क्षेत्रातील प्रकरण असल्याने ती स्त्री बाबा बुवांच्या आहारी जाते त्याचे शब्द प्रमाण मानते व त्यानुसार अख्ख कुटुंबच बसायला, उठायला, नाचायला लागत हि वस्तुस्थिती फार विदारक आहे. 
पुरुषांना जशा वेगवेळ्या चवी हव्या असतात त्यासाठी वेश्याव्यवसायाची गरज पुरुष समाजाला असते. तीच निकड कुठे न कुठे स्त्रियांबाबत असते. तिला ही अस वाटू शकत कि आपले संबंध दुसऱ्या कुणाशी असले तर बरे होईल पण धर्माच्या पागाड्यामुळे , नैतिक कल्पनांमुळे, सामाजिक प्रशिक्षणामुळे ती यासाठी कधीच धजावत नाही. पण ज्यावेळेस हे बाबालोक ज्यावेळेस संधी उपलब्ध करून देतात त्यावेळेस या स्त्रिया या करिता तयार व्हायला ह्या एका मानसिक नैसर्गिक प्रवृत्तीमुळे तयार होत असतात अस वाटण्यासारखी परिस्थिती आहे. 
या वरून हे बाबा, मांत्रिक, भगत, दैवी शक्ती अंगात आणणारे लोक कळत नकळत पुरुष किंवा स्त्री वेश्या आहेत या निश्कर्षापर्यंत सहज जाता येत.
बुवा तेथे बाया ! जिवंत हृदयाच्या शाबूत डोक्याच्या मित्र मैत्रिणींनो - मित्रांनो … आचार्य अत्रेंचे एक वाक्य अतिशय प्रसिद्ध आहे 'वृक्ष तेथे छाया बुवा तेथे बाया !' हे वाक्य ऐकल्यावर सुरुवातीस असे वाटायचे की अत्र्यांचा हा उगाचच केलेला आगावूपणा आहे. असतील काही बाबा, बुवा,बापू असे पण सगळेच असे नसावेत. पण ह्या वाक्याची सत्यता चळवळीच्या अनुषंगाने, डोळस अनुभवाने पटत गेली, दृढ होत गेली. (काही मोठ्या प्रमाणावर भांडाफोड प्रसारित झालेल्या उदा. सह मांडणी करण्याचा मी प्रयत्न करत आहे ) * विद्यानंद महाराज (वर्धा) - खरे तर विवेकानंदांचे तत्वज्ञान सांगणारे हे बाबा. या बाबाच्या नागोबा अंगात येत असे आणि 'विठुलाचा खेळ' नावाखाली हा बाबा स्त्रियांशी संबंध प्रस्तापित करत असे. या बाबाचे खरे नाव चंद्रशेखर जोशी. दहावी नापास असलेला हा माणूस अमेरिकेत (एम. डी. एफ. आर. सी. एस.) डॉक्टर होतो, पण साक्षात्कार झाल्याने पुंन्हा विदेशातील practice सोडून भारतात लोकांचे कल्याणाकरिता आलो असे सांगत असे. …। मित्रांनो - माणूस कधीही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये भेद करत नाही. कारण त्याला प्रत्यक्षामध्ये हा भेद करताच येत नाही. कारण श्रद्धेच्या बाबतीत चार इन्क्रिडीयंट सांगितले जातात. (१) ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याला सर्वश्रेष्ठ मानणे.। (२) ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याचे शब्दप्रामाण्य मानणे (शब्द प्रामाण्य म्हणजे शब्द हेच प्रमाण -उदा . - एखादा बाबा म्हणाला कि मी स्वर्गात जाउन आलो कि आपण त्यावर विश्वास ठेऊन बाबा स्वर्गात जाउन आले असे मानणे ) (३) ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याच्यावर शंका न घेणे. (४) ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्या विषयी चिकित्सा न करणे. मित्रांनो असे चिकित्सा न करता तुंम्ही शब्दप्रामाण्य मानून व्यक्ती,वस्तू,ग्रंथ यावर श्रद्धा ठेवायला लागलात तर श्रद्धेचे रुपांतर अंधश्रद्धेत कधी होते ते लक्षात येत नाही. खरे तर समोरील माणसाला श्रद्धा बाळगणाऱ्या माणसातील अंधश्रद्धा दिसत असते. पण त्याला स्वत:ला तो शब्दप्रामाण्य मानत असल्यामुळे चिकित्सा करत नसल्याने ती अंधश्रद्धा वाटत नसते. त्यामुळे मित्रांनो श्रद्धा आणि अंधश्रद्धा एकच आहेत. काही लोक म्हणतात डोळस श्रद्धा ठेवली पाहिजे, म्हणजेच बदलू शकेल अशी श्रद्धा - खर म्हणजे डोळस प्रकारची श्रद्धा असू शकत नाही - पण हेही खरे आहे की विश्वासाशिवाय माणसाला जगताच येणार नाही. - अनुभव बदलला कि विश्वास बदलतो पण या प्रक्रियेला श्रद्धा या प्रक्रियेत स्थान नाही. अनुभव बदलला कि विश्वास बदलू शकतो. त्याला कुणाचा विरोध असण्याचे कारणच नाही आणि म्हणून श्रद्धा या शब्दाविषयी आपण भांडत नाही. समाजामध्ये आपल्याला श्रद्धा या प्रक्रियेचा वापर करून माणसे मोठ्या प्रमाणावर इतरांना कशा प्रकारे लुबाडत असतात हे प्रकर्षाने दिसते. । मित्रांनो अंनिस च्या चळवळीने हजारो बाबा, बुवा, बापू, मांत्रिक यांची भांडाफोड केलेली आहे. या सर्व भांडाफोड झालेल्या प्रकरणांचा अभ्यास केल्यास असे कळते कि जो जो माणूस स्वत: स्वामी, बाबा म्हणवतो जो जो स्वत:मध्ये दैवी शक्ती आहे असा आभास निर्माण करतो तो तो प्रत्येक बाबा अनेक स्त्रियांचा वापर करीत असतो. *मनमाड जवळील शुकादास बाबा : - स्वत:ला देव अवतार म्हणवणारा काही इयत्ता शिकलेला हा माणूस एका डॉक्टरकडे काम्पौडर होता. त्या अनुभवाच्या जोरावर हा लोकांना बाबागिरी सोबतच औषधाच्या प्रीक्सिप्षनही लिहून देत असे. पुरुषांची तपासणी दोन मिनिटात तर स्त्रियांसाठी लागणारा वेळ हा पाच मिनिटांपासून अर्धा पाउण तास इतका असे. एका जागरूक महिलेच्या तक्रारीवरून आपल्या कार्यकर्त्यांना या बाबाची भांडाफोड करण्यात यश मिळाले होते. तक्रारीनंतर कार्याकर्त्यांजवळ पिडीत महिलांची १००च्या पुढे लिस्ट गेली होती. त्यातील २० ते २५ महिला फोडण्यात समितिला यश आले. व अनेक पुरावे गोळा होऊ शकले. हा शुक्दासबाबा महिलांना एकांतात मी कृष्णाचा अवतार आहे आणि तू गेल्या जन्मीची माझी राधा किंवा आवडती गोपी आहेस, असे सांगून त्यांच्या मनातील गिल्ट (अपराधीपणाची भावना) काडून टाकत असे आणि त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करत असे. मित्रांनो या बाबाचा दरबार अनेक ठिकाणी लागत असे,यामुळे गोपिकांची संख्या देखील वाढली होती. त्यामुळे अनेक गोपिकांचे नंबर या बाबाकडे लागेनासे झाले. त्यातून त्यांची आपापसात कुरबुर वाढून मारामारीपर्यंत वेळ आली होती आणि याचा फायदा चळवळीला झाला समिती त्यांना फोडू शकली आणि मोठ्या प्रमाणावर शुकदासबाबाची भांडाफोड शक्य झाली. *गुलाबबाबा (काटेल - वर्धा) - मित्रांनो हा हि कृष्णावतार … हा बाबा अनेक मुलींना माय संबोधून त्यांच्याशी लहान बाळाप्रमाणे वर्तन करीत असे पुढे संबध प्रस्तापित करीत असे. - ह्याही बाबाला मोठ्या प्रमाणावर एक्स्पोज करण्यात कार्यकर्त्याना यश आले होते. मित्रांनो ज्या ज्या बाबा/बुवांना चळवळीने एक्स्पोज केले होते त्यातील अधिकाधिक बाबा श्रीकृष्ण नावाच्या देवाचा अतिशय वाईट पद्धतीने वापर करून घेत होते. ते सर्व केंव्हा ना केंव्हा आपल्या भक्तांना मी कृष्णावतार आहे आणि तू गोपी किंवा माझी आवडती राधा आहेस असे सांगून त्यांचा वापर सातत्याने करून घेतांना पुढे आले आहे. हे सर्व बाबापर्यंत मर्यादित नसून मांत्रिक, भगत, दीर्घकाळ जोतिशाचा धंदा करणारे लोक थोड्याफार वेगळ्या प्रमाणात हेच करतात हे लक्षात आले. *विधार्भातील सुंदरदास महाराज :- रामास्नेही पंथातील कोट्यावधी संपत्ती असलेल्या समाजातील हा महाराज - याच्याविरोधात अकोला,अमरावतीतील अनेक तरून मंडळी उभी ठाकली होती, परंतु त्यांना फारसे यश न आल्याने या मंडळींनी चळवळीची मदत घेवून या महाराजाला मोठ्या प्रमाणावर एक्स्पोज केले. या बाबाचे भक्त एव्हढे अंधश्रद्धाळू होते की आपल्या नव्या सुनेला देखील पहिल्या रात्रीकरीता सुंदरदासाकडे पाठवत असत. आणि त्याचा अभिमानही बाळगत असत. त्यांची श्रद्धा अशी होती कि त्याने सांगितल्याप्रमाणे हा बाबा दहाव्या मार्गातून मोक्ष मिळवून देतो. याला एक्स्पोज केल्यानंतर रामस्नेही पंथातील साधूंच्या मंडळासमोर या सुंदरदासाला विचारणा करण्यात आल्यावर त्याने अगदी छातीठोकपणे सांगितले की मी जो मार्ग सांगत आहे तोच खरा धार्मिक मार्ग आहे. कारण हा पंथ व्यापाऱ्यांचा आहे. या पंथातील पुरुषांना आपल्या स्त्रियांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो मग या स्त्रिया नोकरांशी संबंध ठेवतात त्यातून वर्णसंकर होतो त्यामुळे धर्माचे प्रचंड नुकसान होते. मी मात्र संबंध निर्माण करून त्या स्त्रियांना शपथ घालतो कि माझ्याशिवाय व तुझ्या नवऱ्याशीवाय कोणाशीही संबध ठेवायचे नाहीत व त्या स्त्रिया माझा शब्द कधीही तोडत नाहीत. त्यामुळे खऱ्या अर्थाने मी धर्म बचावाचे काम करतो आहे, वर्णव्यवस्था टिकविण्याचे काम करतो आहे.असा दावा सुंदरदासने त्या ठिकाणी केला. आणि कालांतराने दडपशाहीच्या जोरावर स्वत: त्या पंथाचा चीफ होऊन बसला. *कृपाळू महाराज :- याला अनाघ्रात स्त्री लागत असे आणि याचे अंधभक्त ते सर्व पुरवित असत. - भारतीय कायद्यानुसार वय १८ वर्षे वयाखालील मुलीवर असा प्रसंग झाल्यास तो बलात्कार ठरतो. -- ह्या संदर्भातील केस दाखल करून बरेच वर्ष हा बाबा नागपूर कोर्टाच्या वाऱ्या करत होता. ** मित्रांनो असं का घडत ? ज्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चारित्र्याचे स्तोम माजवले जाते, प्रत्येक स्त्रीने, मुलीने चारित्र्य संपन्न असावे असे मानले जाते. पुरुषांना थोड्या प्रमाणात सूट दिली जाते. पण स्त्रयांच्या मुलींच्या बाबतीत आग्रह कायम असतो. पुरुषाने काही प्रामाणात लग्नाआधी भानगडी केलेल्या चालतात. पण स्त्रीच्या बाबतीत खपवून घेतले जात नाही. प्रत्येक नवऱ्याला आपली पत्नी अनाघ्रात हवी असते. एव्हढेच नव्हे तर एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीची छेद काढली किंवा tonting केले तर बदडून अगदी गाढवावरून धिंड काढणे, हातपाय तोडण्यापर्यंत मजल जाते. त्या समाजात हे बाबालोक एव्हड्या मोठ्या प्रमाणावर कसे काय संबंध प्रस्थापित करू शकतात. ??? स्त्री-पुरुषांनी आयुष्यभर प्रामाणिक असावं केवळ विवाह या पद्धतीमध्येच या पद्धतीचे शरीरसंबंध निर्माण व्हावे वैवाहिक जीवनाबाहेर कधीही होऊ नयेत हि एक आदर्श कल्पना आपण आपल्या समाजामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला हि कल्पना समाजामध्ये राबवत असतांना पुरुषसत्ताक पद्धती असल्याने पुरुषांनी स्वत:ला मात्र स्वातंत्र्य खेचून घेतले व कायम ठेवले. त्यांना आपले स्वातंत्र्य राबवायचे असेल आणि स्त्रियांनी पूर्णपणे चारित्र्याची संकल्पना आमलात आणायची असेल तर स्वाभाविकच अशा स्त्रीया समाजामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत कि ज्या चारित्र्य बाळगणार नाहीत. त्यांच्यावर चारित्र्याचे बंधन असणार नाही. यातूनच वेश्याव्यवसाय यंत्रणेला सुरुवात झाली. आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय समाजामध्ये निर्माण झाला. हि जी दुहेरी नितीमत्ता आहे की स्त्रियांना वेगळी मोरलीटी आणि पुरुषांना मात्र त्या मोरालिटीमध्ये थोडी लवचिकता, यातून जशी स्त्री वेश्यांची निर्मिती घडते आणि ती समाजामध्ये अपरिहार्य ठरते त्याच पद्धतीने पुरुषवेश्यांची निर्मिती सुद्धा अपरिहार्य ठरते. कारण - लग्नसंस्थेतून हे प्रश्न सुटतातच असे नाही. एक तर भारतीय १००% पुरुषांना शरीरसंबंधातील ज्ञान असतेच असे नाही. अनेकांना असे वाटते की मुल होणे म्हणजे आपल्याला या संबंधी परिपूर्ण ज्ञान आहे. बाबा /बुवा यांच्याशी एंटेन्गल झालेल्या स्त्रीयांशी संवाद साधल्यावर त्या म्हणाल्या हे बाबा महाराज या बाबतीत खूपच प्रवीण असतात. आमची फसगत झाली पण त्यावेळी आम्ही परमानंदात होतो. मित्रांनो याचा नेमका अर्थ लक्षात घेतला पाहिजे. - भारतीय समाजामध्ये स्त्रियांना एका बाजूने सेक्सबद्धल चुकीच्या संकल्पना सांगितल्या जातात. त्याना हे सुद्धा सांगितल जात की सेक्समध्ये रुची वाटता कामा नये. बाईला केवळ प्रेमामध्येच रुची वाटायला हवी. थोडक्यात एक फ्रीजीडीटी निर्माण होईल कमी लैंगिक इच्छा निर्माण होईल या पद्धतीचा संस्कार स्त्रियांवर असतो. पुरुषसुद्धा कमी लैंगिक इच्छेची धारणा कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. स्वसमाधान पुरेसे मानतात. त्यातून सेक्ससंबंधी आवड निर्माण होण्याऐवजी कंटाळवाणा प्रकार या पद्धतीने पहाण्याचा कल स्त्रियांमध्ये वाढत जातो. या पद्धतीच्या स्त्रिया देवा धर्माच्या जास्त नादाला लागलेल्या दिसतात कारण मनामध्ये साचून राहिलेली भावना देवाधार्मासाराख्या क्रियांमधून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. भजन-कीर्तन करतात. देवाच्या आहारी जाण्याचा प्रयत्न करतात. आणि या पद्धतीच्या स्त्रिया देवाचा अवतार असलेल्या बुवांकडे अधिक मोठ्या संखेने खेचल्या जातात. सर्वात पाहिलं काम बुवा कोणत करत असेल तर या स्त्रियांच्या मनातील गिल्ट कॉम्प्लेक्स काढून टाकतो. बुवा बाबांना हे सांगण्याची खर म्हणजे गरज नाही कि मी कृष्णावतार आहे व तू गोपी आहेस कारण - भारतीय समाजात स्त्रीला सहजपणे ज्याच्यापर्यंत पोहचता येते ते म्हणजे बाबा, बुवा, मांत्रिक,ज्योतीशी हे आहे. डॉक्टरकडे सुद्धा तिला सहजतेने जाता येत नाही. एखादा पुरुष डॉक्टर एखाद्या स्त्रीला जास्त वेळ आतमध्ये तपासत असेल तर बाहेर बसलेला पुरुष अस्वस्थ होतो. किंवा नातेवाइक अस्वस्थ होतात. पण बाबा, बुवांकडे तासंतास आहे तर यामध्ये पवित्रता आहे. यामध्ये देवाचं काहीतरी आहे. म्हणून माणसं नेहमी खुश होतांना दिसतात की माझी बायको फार मोठी धार्मिक आहे, ती बाबांची फार मोठी भक्त आहे. त्यामुळे स्त्रीला पुरूषांजवळ जाण्याची उत्तम संधी मिळत असेल तर ती असल्या बाबा,बुवा, मांत्रिक, ज्योतिषी या पद्धतीच्या पुरुशांजवळ जाण्याची त्यामुळे स्वाभाविकच यामार्गातून त्यांना रिलेशन निर्माण करता येतात. यामध्ये हे बाबालोक स्त्रियांच्या मनातील गिल्ट कॉम्प्लेक्स काढून टाकतात, राधाकृष्ण यासारखे संबंध जोडून यामागे वावगे काही नाही, हीच देवाची दिशा आहे, या संबंधातून केवळ तुझाच नव्हे तर तुझ्या कुटुंबाला सुद्धा मोक्ष मिळणार आहे असं सुंदरदास सारखा बाबा पटवून देण्यात यशस्वी होत असतो. एखादा मांत्रिक घरातील उद्भवलेल्या अडचणीपासून सुटका मिळण्यासाठी स्त्रीला आपल्याशी संबंध ठेवण्यास भाग पडतो. या प्रमाणे तांत्रिक कल्पनांच्या नावाखाली देवाच्या अवताराच्या नावाखाली किंवा गेल्या जन्मी तू कोणीतरी मी कोणीतरी होतो म्हणून याही जन्मी हरकत नाही, या पद्धतीची खेळी वापरून स्त्रियांच्या मनातील अपराधीपणाची भावना काढून टाकतात. या पद्धतीचा पुण्यामधील काही वर्षांपूर्वी मिसर नावाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी वाघमारेबाबा बाबत सखोल चौकशी करून वाघमारेबाबा प्रकरण बाहेर काढले होते. मित्रांनो असे बाबा स्त्रियांच्या बाबतीत वीरपुरुष सिद्धपुरुष ठरतो. त्यानंतर ती स्त्री सातत्याने त्यात अडकत जाते. मित्रांनो वाईट भाग हा आहे कि हे सगळ धर्म आणि श्रद्धा या क्षेत्रातील प्रकरण असल्याने ती स्त्री बाबा बुवांच्या आहारी जाते त्याचे शब्द प्रमाण मानते व त्यानुसार अख्ख कुटुंबच बसायला, उठायला, नाचायला लागत हि वस्तुस्थिती फार विदारक आहे. पुरुषांना जशा वेगवेळ्या चवी हव्या असतात त्यासाठी वेश्याव्यवसायाची गरज पुरुष समाजाला असते. तीच निकड कुठे न कुठे स्त्रियांबाबत असते. तिला ही अस वाटू शकत कि आपले संबंध दुसऱ्या कुणाशी असले तर बरे होईल पण धर्माच्या पागाड्यामुळे , नैतिक कल्पनांमुळे, सामाजिक प्रशिक्षणामुळे ती यासाठी कधीच धजावत नाही. पण ज्यावेळेस हे बाबालोक ज्यावेळेस संधी उपलब्ध करून देतात त्यावेळेस या स्त्रिया या करिता तयार व्हायला ह्या एका मानसिक नैसर्गिक प्रवृत्तीमुळे तयार होत असतात अस वाटण्यासारखी परिस्थिती आहे. या वरून हे बाबा, मांत्रिक, भगत, दैवी शक्ती अंगात आणणारे लोक कळत नकळत पुरुष किंवा स्त्री वेश्या आहेत या निश्कर्षापर्यंत सहज जाता येत.