Wednesday, August 17, 2016

जगदीश काबरे

1] मनुस्मृती,पुराणे आणि देवळे असा तिपेडी फास हिंदू समाजावर लटकवून भिक्क्षुकशाही ब्राम्हणांनी आपल्या जातीच्या सवतसुभ्याचं सोवळं वर्चस्व आजवर टिकवून धरलेलं आहे.या मर्मावर कुणी घाव घालताच एकजात सुधारक-दुर्धारक भट सापासारखे फुसफुसतात. कारण या तिपेडीवर प्रत्येक भट जगत असतो. पण या तीनही गोष्टी म्हणजे अखिल भटेतर दुनियेच्या उरावरील प्राणघातक धोंडी आहेत. या गोष्टी नष्ट करा! जाळून खाक करा!! की भिक्षुकशाही रसातळाला गेलीच!!! ( प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘देवळांचा धर्म, धर्माची देवळे’ या पुस्तकातून साभार.)

2] जुने-जुनाट असणे हा विषय अभिमानाचा कसा असू शकतो ? एखादा माणूस अनेक वर्षे एकच जुनाट वस्त्र वापरत असेल तर त्यास आपण दारिद्र्याची, दुर्दैवाची खूण समजू की अभिमानास्पद वैभवाची ? मग ऐंशी टक्के माणसांना गुलाम ठरवणाऱ्या जुनाट संस्कृतीचा अभिमान का बाळगावा ? [नरहर कुरुंदकर, मनुस्मृती- इंद्रायणी प्रकाशन]

3] मुखें सांगे ब्रम्हज्ञान ।जन लोकाची कापितो मान ।।१।। ज्ञान सांगतो जनासी । नाहीं अनुभव आपणासी ।।ध्रु।। कथा करितो देवाची । अंतरी आशा बहु लोभाची ।।२।। तुका म्हणे तो चि वेडा। त्याचें हाणूनि थोबाड फोडा ।।३।।

4] महारासी सिवे । कोपे ब्राह्मण तो नव्हे ॥१॥  तया प्रायश्चित्त काही । देहत्याग करिता नाही ॥धृ॥  नातळे चांडाळ । त्याचा अंतरी विटाळ ॥२॥ज्याचा संग चित्ती । तुका म्हणे तो त्या याती३॥[संत तुकाराम महाराज ]

5] वैज्ञानीक शोध लावणाऱ्यात एखादा तरी चमत्कारी-दैवी शक्तीधारी बाबा, बूवा, बापू, महाराज, साध्वी, पंडित आहे का? यांच्याकडे तर दैवी सिद्ध शक्ती असते म्हणे!
यांच्या तंत्रा-मंत्रात-पुजेत-पंचांगात आणि होमहवनात शक्ती असते म्हणे!! मग ह्या ''नमुन्यांनी" एखादा तरी शोध लावायला पाहिजे होता की नाही? पण यांनी आजपर्यंत एक तरी शोध लावला का? नाही ना? कारण मित्रांनो, बाबा,बुवा,महाराज,पंडित ही सर्व माणसे देवाधर्माच्या नावावर जगणारी व चलाखीने सर्वसामांन्याचे शोषण करणारी बांडगुळं आहेत.

वैज्ञानिक ,संशोधक शास्त्रज्ञ आणि ज्यांनी समानतेचे धडे दिले ते समाजसुधारक संतच आपले खरे हिरो व आदर्श आहेत. त्यांच्या संशोधन आणि अथक परिश्रमांमुळेच जनजागृती होऊन आज समाजास सुखी व आनंदमय जीवन लाभलेले आहे.या बांडगुळांमुळे नाही. म्हणुन पालकांनी आपल्या मुलामुलींवर व शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर चिकित्सक विज्ञानवादी व बुद्धीप्रामाण्यवादी होण्याचे संस्कार केले पाहिजेत. तेव्हाच भारतात जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ पुन्हा तयार होतील.तरच प्रगत व बलशाली भारत निर्माण होईल.(^M^)  (^J^) (मनोगते)