Monday, July 1, 2013

मराठी सिनेमातील गाणे

मराठी सिनेमातील हे गाणे बुवाबाजीचे स्वरूप उघड करते. जरूर पहा.

Monday, June 10, 2013

आधुनिक अंधश्रद्धा अर्थात बुवाबाजी...

आजकाल बुवा बाबांची संख्या वारेमाप वाढलीय. पूर्वीची बुवाबाजी अत्याधुनिक रूप घेऊन आलीय. बुवा, बाबा, भगत, मांत्रिक, तांत्रिक हे शब्द बदलून स्वामी, महात्मा, गुरुजी, महाराज, सद्गुरु अशा अनेक हायटेक उपाध्यांमध्ये रूपांतरीत झालेले दिसतात.
आजचे बाबा हुशार आहेत, उच्चशिक्षितही आहेत. समाजमनाचा दांडगा अभ्यास त्यांनी केलेला असतो. मानसशास्त्रही ते कोळून प्यालेले असतात. समाजाची नाडी त्यांनी ओळखलेली असते. म्हणूनच त्यांच्या सत्संगांना हजारो लाखोँच्या संख्येने गर्दी होते.
देव, देवता, स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, चौऱ्‍याऐंशीचा फेरा, आत्म्याचे अमरत्व, परमात्म्याशी तादात्म्य पावणे, कुंडलिनी जागृत करणे, मोक्षप्राप्ती अशा अवैज्ञानिक, बिनबुडाच्या संकल्पनांचा समाजाच्या अस्थिर मनावर भडीमार करीत हे बाबालोक आपणाला शरण आल्याशिवाय तरणोपाय नाही हे पटवून देण्यात यशस्वी ठरतात. अशा या भ्रामक कल्पनांच्या आहारी जाऊन सूज्ञ व्यक्तिदेखील स्वतःची सद्सद्विवेकबुद्धी बाबांच्या चरणी गहाण ठेवतात हीच ती खरी अंधश्रद्धा. मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले, आता मंगळावर मोहीम चालू आहे आणि दुसरीकडे मी मी म्हणणारे सुशिक्षितसुद्धा मोक्षप्राप्तीच्या मृगजळामागे धावतांना दिसतात. हीच ती आधुनिक अंधश्रद्धा.
एकदा का बुवाचे अनुयायी झाले की आपल्याला सुख, समाधान, शांती मिळेल अशी शरणार्थी व्यक्तीची धारणा बनते. मग ती बाबाच्या बुवागिरीत पुरती अडकते, भरडली जाते. ती कशी? ते पुढील उदाहरणांवरून स्पष्ट होईल-
बांबांच्या कंपूत किंवा कळपात फक्त शिरता येते बाहेर पडण्याचा विचार मुळापासूनच छाटला जातो.
बांबांच्या कृपादृष्टीशिवाय तरणोपाय नाही असे बिंबवले जाते.
जीवनातील दुःखे, चिंता, समस्या बाबांमुळे हमखास दूर होतील याची हमी हस्तकांकरवी दिली जाते.
आलेल्या संकटाचा किंवा अडचणीचा सामना आपण नाही तर खुद्द आपले बाबाच करतील असा विचार बळावून व्यक्ति निष्क्रिय बनते.
बांबांनी वेळोवेळी ठरवून दिलेले साधना साहित्य त्यांच्या भांडारातूनच खरेदी करण्याची अलिखित सक्ती असते.
जपमाळा, बाबांच्या प्रतिमा, फोटो, नेमून दिलेले ग्रंथ-पोथ्या, बाबांच्या गौरवार्थ त्यांच्याच मठातून प्रकाशित होणारी मासिके, विशेषांक, कॅसेटस्, सीडीज, भिंतीवरची कॅलेंडर्स, बाबांची छबी असलेल्या अंगठ्या, ताईत, पदके, गळ्यातल्या माळा, वह्या,पेन इ.इ. भक्ताच्या माथी मारले जाते. ते साहित्य खरिदण्याशिवाय पर्याय नसतो.
बांबांचा जाहीर कार्यक्रम वा सत्संग वा दर्शन सोहळा जेथे असेल त्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित रहावेच लागते.
अमूक रोगावर तमूक औषध म्हणून भांडारातून दिल्या जाणाऱ्‍या गोळ्या भलेही शेणा-मातीच्या असल्या तरी भक्त बाबांचे नाव घेऊन सेवन करतांना आढळतो.
बाबा म्हणतील ती पूर्वदिशा असते. का? कसे? असले फालतू प्रश्न विचारून त्यांना गोत्यात आणणाऱ्‍या भक्ताला जागीच ताकीद देण्याची तजवीज बांबांचे हस्तक करीत असतात.
सर्व भिस्त बाबांवर सोपवून निवांतपणे अध्यात्माच्या नावाखाली बाबांची व्यक्तिपूजा करण्याची सवय लागल्याने व्यक्ती वैचारिक, मानसिक, शारीरिकदृष्ट्या पंगु बनविली जाते.
बाबांचा अनुग्रह नामांकित व्यक्तींनी (उदा. नेते, अभिनेते, खेळाडू इ.) घ्यावा असे जाळे हस्तकांमार्फत पसरवले जाते. बाबांचे चरणस्पर्श करा तुम्हांला अपयश येणार नाही असे त्या वलयांकितांना पटवून दिले जाते आणि एकदा का अशी व्यkti बाबांकडे आली की प्रसारमाध्यमांना हाताशी धरून त्या बातमीचा उपयोग बाबांची प्रसिद्धी करण्यासाठीच केला जातो. बाबांकडे नक्कीच काहीतरी अद्भूत शक्ति असल्याशिवाय ती व्यक्ती अनुग्रह घेणार नाही अशी समाजमनाची ठाम समजूत होते आणि बाबांचा कळप वाढीस लागतो.
काही व्यक्तींच्या अगतिकतेचा, असहायतेचा गैरफायदा बुवाबाबांकडून घेतला जाऊन प्रसंगी संमोहन विद्या वापरून तिचा शारीरिक उपभोगसुद्धा घेतला जातो. बाबांना ईश्वरतुल्य मानले जात असल्याने अशी प्रकरणे मठाच्या शयनगृहातच दडपली जातात. फार क्वचितवेळा बाहेर पडणाऱ्‍या भानगडी म्हणजे हिमनगाचे टोक असते.
अशा अनेक प्रकाराने ही बाबागिरी,बुवाबाजी सामान्यजनांची लूट ठरते...
बाबांच्या भजनी लागले जाण्याची कारणे कोणती?
बहुदा ती मानसिक असतात. धावपळीच्या संघर्षमय जगात टिकून राहण्याचा तणाव प्रत्येकाच्या मनावर असतो. त्यातून उद्भवणाऱ्‍या चिंता, काळज्या, विवंचना ह्या मनोकायिक आजारांचे रूप घेऊन येतात. कितीही तपासण्या केल्या तरी शारीरिक आजार सापडत नाही. अशावेळी समुपदेशनाची गरज असते परंतु चांगले सांगणारा गोड बोलणारा कोणी भेटत नाही. पैशालाच सर्वस्व मानणाऱ्‍या या दुनियेत हितचिंतक, मित्र, स्नेही, नातलग भेटतील म्हणता भेटत नाहीत. त्रिकोणी कुटुंब व्यवस्थेमुळे म्हणा किंवा पैशापाठी धावून थकल्यामुळे म्हणा जोडीदारांमध्येही फारसा सुसंवाद होत नाही. परिणामी ताण तणाव वाढतात. मग व्यक्ति मनःशांतीच्या शोधात बाबांपर्यंत येऊन ठेपते. बाबांची अतिसमाधानी मुद्रा, तेजःपुंज चर्या, डोळ्यातील सुखाची शीतल चमक या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून विदीर्ण मनाच्या व्यक्तीला बाबांची ओढ लागते. बाबांचे मोहमयी दर्शन म्हणजे दुखऱ्‍या व्रणांवरचा लेप वाटतो. त्यांची मिठास वाणी व मधुर संभाषणाची नशा हवीहवीशी वाटू लागते आणि क्षणार्धात व्यक्ती बाबांची भक्त होते.
दडपणाखाली वावरणाऱ्‍या, न्यूनगंड असलेल्या किंवा पारतंत्र्य सोसणाऱ्‍या व्यक्तींना बाबांच्या सत्संग, प्रवचनांना जाणे म्हणजे स्वातंत्र्य उपभोगणे किंवा स्वतःला सिद्ध करून दाखवणे अशा प्रकारातले असते.
काहीजण खून, दरोडे, चोऱ्‍या, भ्रष्टाचार, व्यभिचार आदी पापांचे क्षालन बाबांच्या माध्यमातून होईल अशा हेतूने बाबांच्या भजनी लागतात.
या बुवाबाजीच्या अंधश्रद्धेला लगाम घालण्यासाठी प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणे, हरेक घटनेच्या मुळाचा चौकस नजरेने शोध घेणे, स्वतःवर, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणे यासारखे उपाय अंगिकारता येतील.
- डॉ.श्रीराम दिवटे

Saturday, June 1, 2013

भुताचे दर्शन

10 वीत असतानाचा हा किस्सा . त्यावेळी "झलक दिखलाजा " हे गाण खूप famous झाल होत .
एके दिवशी मी 'आज तक ' news channel वर पाहिलं होत की  "गुजरात मध्ये एक गाव आहे . त्या गावात झलक दिखलाजा song लावलं का भूत येतात."
...
हे ऐकून मी एक plan बनवला. रात्री स्मशानात बसून जागायचं आणि ते गाण म्हणायचं  "झलक दिखला जा .
मी मनाशीच म्हंटल "बघू तरी कशी भूत येतात ????
मी हा plan माझा एक खास मित्र 'अभी' ला सांगितला. तो plan ऐकून यायला तयार झाला .
दिवसांनी अमावस्या होती त्याच दिवशी जायचं ठरलं ……
ठरल्या दिवशी मी घरी सांगितल की "मी अभी कडे झोपायला चाललोय …. "  अभी ने त्याच्या घरी सांगितल की मि "हसीम कडे झोपायला जातोय … "
बरोबर १०:३० वाजता आम्ही भेटलो आणि चालत चालत स्मशानाकडे निघालो . आम्ही खुप आतुर झालो होतो . जाताना मला रस्त्याच्या बाजूला एक oil paint चा डब्बा दिसला .
मी तो डब्बा स्मशानात वाजवायला घेतला . music पण हव ना गाण्या बरोबर म्हणून ….
स्मशानात पोहोचलो. स्मशानामध्ये एक पत्रा टाकून बनवलेली शेड होती …. त्या मध्ये एक कट्टा होता जिथे मेलेल्या माणसाला जाळतात …… आम्ही त्यावर जाऊन बसलो ...
अभी ने तो oil paint चा डब्बा वाजवायला सुरवात केली , मग मी पण हिमेश प्रमाणे ' oooooouuuuuu huujooooorrrrrr ­rrr ' पासून सुरवात केली .
मग आम्ही दोघ मिळून ओरडायला लागलो "झलकदिखलाजा ,झलक दिखलाजा , एक बर आजा आजा sssssssss जाsss "
तेवढ्यात जवळच्या एका झुडूपामधुन एक बाई किंकाळत किंकाळत बाहेर आली . आणि तशीच किंकाळी फोडत शिंदे वस्ती कडे पाळली …….
अंधार असल्यामुळे आम्हाला काही स्पष्ट नाही दिसलं . पण हे बघून आम्ही दोघे चांगलेच घाबरलो . तो डबडा दिला टाकून आणि लागलो दोघ पाळायला . पळत - पळतच गावात परत आलो . आणि सरळ मारुती मंदिरात घुसलो .
अभी बोलायला लागला "बघ होतं कि नाही भूत.. बघ होतं कि नाही भूत ???".
माझी तर चांगलीच फाटली होती . मी तर काही बोलायच्याहि शुद्धीत नव्हतो .
परत कधी भुत पहायचं नाही असं  ठरवून आम्ही मारुतीच्या मंदिरातच झोपलो .
सकाळी उठून घरी आलो . घरी कोणाला काहीही माहित नव्हतं . आम्ही दोघांनीही आमच्या घरी काही एक सांगितल नाही .
- दिवसांनी शिंदे वस्तीतल्या काकू आमच्या घरी आल्या आणि माझ्या आईला सांगू लागल्या
"
तेरे को काय सांगू हसीम की आई ……
परवा रात को मै toilet के लिये स्मशान के पास गयी . तब दोन भूत वहा डबडा बजा रहे थे और गा रहे थे 'एक बार आजा आजा आजा '. मै कसल्या घाबरी क्या सांगू तेरेको अब ???
मै तो बाई तिथच चिम्पाट फ़ेकके भागी ना….

-इंटरनेटवरून साभार

Thursday, May 30, 2013

बिरबलाची हुशारी

अवश्य पड़ियेगा ।।।।

आज मै आप लोगो को एक और शिक्छाप्रद कहानी सुनाता हु ।

किसी समय की बात है एक गाव मे एक गरीब आदमी अपनी पत्नी और एक बच्चे के साथ रहता था, एक दिन अचानक किसी दुर्घटना वश उस आदमी की मौत हो जाते है, और उसकी पत्नी बिल्कुल बेसहारा हो जाती है, उसके पास एक भैस रहती है जिसका दुध बेचकर वो महीला अपना और अपने बच्चे का पालन पोषण करती है ।।।

लेकीन अचानक एक दिन एक ब्राह्मण उस महीला के पास आकर कहता है कि आपके स्वर्गवासी पती ने मुझे वचन दिया था कि उनके पास एक भैस है और वो उस भैस को बेचकर उससे जो भी रकम प्राप्त होगी मुझे दान कर देंगे ।।।।

यह सुनकर महीला चौक जाती है, और ब्राह्मण से कहती है की उसके पती ने इसके बारे मे उससे कभी नही कुछ कहा ।।।

ये सुनकर ब्राह्मन क्रोधीत हो जाता है और कहता है कि मै एक ब्राह्मण हु और मै कभी झुठ नही बोलता, तेरे पती ने मुझे वचन दिया था कि वो इस भैस को बेचकर प्राप्त रकम मुझे दान मे देगा । चुकि अब तेरा पती नही रहा तो अब ये तेरा कर्तव्य है, की तु उसके वचन को पुरा करे ।।।

यह सुनकर वो महीला कहती है, कि मै यह वचन पुरा नही कर सकती, इसी भैस के दुध की आमदनी से मेरे परिवार का गुजारा होता है ।।

इस पर ब्रह्मण जवाब देता है कि तुझे उसका वचन पुरा करना हि होगा अन्यथा तेरे पती की आत्मा को शान्ती नही मिलेगी उसे अभी मुक्ती नही मिल सकेगी ।।
एसा कह कर वो ब्राह्मण उस लाचार महीला को धर्म संकट मे डाल देता है ।।।

कुछ दिनो के बाद ये बात बादशाह अकबर के दरबार मे पहूंचती है, बादशाह अकबर इस समस्या के निराकरण के लिये बिरबल को उस महीला के पास भेजते है ।

अब चतुर बिरबल उस महीला के पास जाकर पुरी स्थीती का आकलन करते है, और बिरबल देखते है कि उस महीला के बास एक पालतु बिल्ली भी है ।।
फिर बिरबल उस ब्राह्मण को बुलाकर समझाने की कोशीस करते है लेकिन ब्राह्मण अपनी बात पर अडींग रहता है, तो फिर बिरबल् भैस को निलाम करके प्राप्त राशी ब्राह्मण को देने का निश्चय करते है ।

फिर भैस की निलामी के लिये गाव के लोगो को इकट्ठा किया जाता है ।।
निलामी से पहले बिरबल एक शर्त रखते है वो उस महीला की पालतु बिल्ली को हाथ मे लेते हुए कहते है कि इस बिल्ली का भरण पोषण भी इसी भैस के दूध से होता है, अगर ये भैस चली जयेगी तो इस महिला कि तरह इस बिल्ली के पालन पोषण की भी समस्या पैदा हो जयेगी । अतः जो भी इस भैस को खरीदेगा उसे साथ मे ये बिल्ली भी खरीदनी पड़ेगी ।।

यह सुनकर गाव के लोग आश्चर्य मे पड़ जाते है भला बिल्ली को कौन ख्ररिदेगा ??

अब बिरबल उनकी किमत रखते है, बिरबल कहते है कि इस भैस किमत है 5 रुपए और इस बिल्ली की किमत है 600 रुपए ।।
गाव वालो मे से एक समझदार व्यक्ति उस भैस और बिल्ली को खरीद लेता है ।।

अब ब्राह्मण को पैसे देने कि बारी आती है, ब्राह्मण बड़ा खुश हो कर मुह से राल टपकाते हुए बिरबल के पास आता है ।।।

बिरबल उस ब्राह्मण को 5 रुपये दे देते है ।। यह देख ब्राह्मण कहता है कि यह क्या है, आप मुझे सिर्फ पाच रुपए दे रहे है ???

इस पर बिरबल उत्तर देते है, की इनके पती ने आपसे भैस की किमत दान करने का वचन दिया था बिल्ली की नही ।। सौदे के मुताबिक बिल्ली की किमत 600 रुपए है और भैस की किमत मात्र 5 रुपए है, जो की आपको दे दि गयी है ।।

यह सुन कर ब्राह्मण मुह लटका कर वहा से चला जाता है और बिरबल बाकी के 600 रुपए उस विधवा महीला को देते हुए कहते है कि इन पैसो से आप दुसरी भैस खरीद कर अपना और अपने परीवार का पालण पोषण कर सकती है ।।।

तो मित्रो इस कहानी से हम सभी को क्या सिख मिलती है ???

Tuesday, May 28, 2013

अध्यात्म...


उन्हाळ्यात लावी
दगडा चंदन
मरतो राबून
... शेतकरी...

करोडोंची माया
जमवोनि ठेवी
दगडाच्या पायी
गर्भगृही...

रिकामटेकडे
फुकटचे खाती
कष्टकर्‍या हाती
टाळ देती...

करोडोंचे मठ
स्थापोनि अनंत
झालेत महंत
मोक्षमार्गी...

भस्मलावे साधू
जाहले अनंत
परि त्यात संत
कोणी नसे...

पुजार्‍यांची दिसे
गर्भारली पोटे
झोपडीत काटे
भक्षितात...

न खात्या देवाला
रोजचा खुराक
जीवंत बालकं
कुपोषित...

देवाच्या निवासा
प्रचंड राऊळे
जिवंत मावळे
निर्वासित...

ठासून सांगतो
देव नाही कोठे
मानव्यचि मोठे
धर्म-कर्म...

सुधाकर कदम

Sunday, May 26, 2013

ज्योतिषांनो, या प्रश्नांची उत्तरे द्या.

१) फलज्योतिष हे शास्त्र आहे का?
 २) पूर्वी फलज्योतिष आणि खगोलशास्त्र एकत्र होते. ग्रीकांपासून, आर्यभट्टापासून ते गॅलिलिओ-कोपर्निकसपर्यंत अनेक सुप्रसिद्ध खगोलशास्त्री ज्योतिषीही होते, पण एकोणिसाव्या शतकात खगोलशास्त्र व फलज्योतिष वेगळे झाले, ते का?
३) खगोलशास्त्र ही विज्ञानाची व वैज्ञानिक अभ्यासाची महत्त्वाची शाखा झाली. त्याचा अभ्यास जगभराच्या सगळय़ा विद्यापीठांमधून होता; परंतु फलज्योतिष मात्र चोथा समजून विज्ञानाने फेकून दिले. असे का? 
४) जगभराच्या 186 वैज्ञानिकांनी, ज्यात १९ नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत, 'फलज्योतिष हे शास्त्र नाही. तो केवळ काही लोकांचा पोट भरण्याचा धंदा आहे. त्यावर जनतेने विश्‍वास ठेवू नये,' असे पत्रक काढले व ते जगभर प्रसिद्ध केले. त्याबद्दल 'ज्योतिष अधिवेशना'चे काय मत आहे? 
५) आजचे फलज्योतिषी ९ (किंवा १२) ग्रह मानतात. त्यात राहू, केतू नावाचे ग्रहही मानतात. प्रत्यक्षात राहू-केतू अस्तित्वातच नाहीत. ते ग्रहही नाहीत. तरी ज्योतिषी मात्र आजही जनतेच्या कुंडल्यांमध्ये (होरोस्कोप) राहू-केतू फिरवतच असतात. ते का? कसे? अस्तित्वात नसलेल्या राहू-केतूंना स्थान देणार्‍या कुंडल्या किती विश्‍वसनीय असू शकतात? व त्या आधारावर उभ्या असणार्‍या फलज्योतिषात कितपत अर्थ असू शकतो? 
६) चंद्र-सूर्याला ग्रह म्हणून आजही स्थान दिले जाते. चंद्र हा उपग्रह आहे, हे खगोलशास्त्राच्या ज्ञानामुळे पाचव्या वर्गातल्या मुलालाही ज्ञात असते. तरी सुशिक्षित विद्वान ज्योतिषीही चंद्राला ग्रह म्हणूनच कुंडलीत स्थान देतात. अशा अवस्थेत विद्वान ज्योतिष्यांपेक्षा पाचव्या वर्गातल्या मुलांनाही अधिक ज्ञान असते, असे का मानू नये?
७) सूर्य हाही ग्रह म्हणूनच कुंडलीत मांडला जातो व आजही ज्योतिषी पृथ्वीभोवतीच (कुंडलीत) सूर्याला फिरवत असतात. सूर्य हा तारा आहे. तो ग्रह नाही व पृथ्वी इतर ग्रहांसोबत सूर्याभोवती फिरते हे शाळकरी मुलांना जसे शिकवले जाते तसेच ज्योतिष्यांना शिकवावे, प्रसंगी त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा काढाव्यात, अशी विनंती आम्ही सरकारला करावी काय? 
८) पृथ्वी हा ग्रह आहे. त्याचा पत्रिकेत ग्रह म्हणून का समावेश नाही? 
९) ग्रहाचा मानवी जीवन प्रवाहावर परिणाम होतो असे फलज्योतिषी सांगतात व त्यावरच त्यांचे शास्त्र अवलंबून आहे. याला वैज्ञानिक आधार काय? एकाच स्थळी व एकाच ठिकाणी राहणार्‍या माणसांवर एकाच ग्रहाचे, ते केवळ वेगवेगळय़ा वेळी जन्मले म्हणून वेगवेगळे परिणाम कसे होतील? 
१०) सगळे ग्रह व सूर्य यांची भ्रमणकक्षा व काळ निश्‍चित आहे. पुढील पाच हजार वा पाच लाख वर्षांनंतर तो निश्‍चित ठरावीकच असणार आहे. याचाच अर्थ ज्योतिषशास्त्रानुसार  प्रत्येक मनुष्याचे भविष्य तो जन्मत:च ठरलेले असते. असे असतानाही अनेक ज्योतिषी ग्रहदशा बदलण्याचे व ग्रहांचे अरिष्ट टाळण्यासाठी अनेक पूजा, ताईत, खडे वगैरे उपाय सांगतात व ठरलेले आयुष्य बदलवता येते असेही सांगतात. ते कसे? ग्रहांची दिशा, स्थान व भ्रमण निश्‍चित असूनही या उपायांनी माणसांचे भविष्य बदलतेच कसे? हे सगळे उपाय म्हणजे सामान्य लोकांना लुबाडण्याची ज्योतिष्यांची एक क्लृप्ती नव्हे काय? मुळात माणसांचं आयुष्य ठरलेलं असतं हे सांगणंच लबाडी नव्हे काय? 
११) माणसाचा जन्म आणि मृत्यू ठरलेला असतो का? ठरलेला नसेल तर फलज्योतिषाला काही आधार उरेल काय? पण जर जन्म ठरलाच असेल तर मनुष्य स्वत: निर्णय घेऊन आजच्या काळात भारतीय कायद्याच्या परवानगीने कृत्रिम गभर्पात करतो व जन्माला येणा?र्‍या नव्या मनुष्याचे अख्खे आयुष्यच थांबवतो, हे कसे? ठरलेला जन्म कृत्रिम उपायांनी थांबवणारा मनुष्य ग्रहांपेक्षा वा नियंत्यापेक्षा मोठा मानायचा का? 
१२) मृत्यू ठरलेला असतो का? अ) तो जर ठरलेला असेल तर, १९३० साली भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य केवळ १८ वर्षे होते. आता ते ६८ वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. हे अधिकचे सरासरी आयुष्य भारतीयांच्या वाट्याला कुठून आले? याचे उत्तर फलज्योतिष्यांना पत्रिकांमध्ये दाखवता येईल का? आ) मृत्यू ठरलेला असतो असे मानणारे ज्योतिषी आपल्या घरच्यांना व स्वत:लाही औषधोपचार का करतात? ते डॉक्टरांची मदत का घेतात? जर मृत्यू ठरलेल्या क्षणीच होणार असेल तर डॉक्टरांची मदत घेऊन स्वत:चा व स्वत:च्या नातेवाईकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करून पैसा फुकट घालविणे मूर्खपणाचे नव्हे का? इ) एकाच अपघातात ज्यावेळी शेकडो लोक मरतात त्या वेळी त्या सगळय़ांचा मृत्युयोग असतो काय? नागासाकी-हिरोशिमा अणुस्फोट व सगळय़ाच मोठय़ा अपघातांबद्दल काय? तसा पुरावा पत्रिका तपासून देता येईल काय? 
१३) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या पंचवीस वर्षांपासून ज्योतिष्यांना सारखी आव्हाने देत आहे, तरी ज्योतिषी ती आव्हाने स्वीकारून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तोंड एकदाचे बंद का करीत नाही? 
१४) दोनदा २०-२० पत्रिकांच्या आधारे, माणूस मेलेला आहे की जिवंत आहे व स्त्री की पुरुष आहे हे सांगा. दोन्ही वेळेस उत्तरे ९० टक्क्यांपेक्षा अधिक ९५ टक्के अचूक निघायला हवीत, तर १५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल किंवा मानवी जीवनातील, तपासून शहानिशा करता येतील अशा कोणत्याही पाच घटना (लग्न, मूल, नोकरी, शिक्षण, अपघात, बढती वगैरे) वीस पत्रिकांच्या आधारे सांगाव्यात. त्या ९० टक्के खर्‍या ठराव्यात. दोनदा वीस-वीस पत्रिकांची भाकिते ९० टक्के अचूक निघावीत. १५ लाख मिळतील; पण ७० टक्के जरी खरी निघाली (दोनदा २०-२० पत्रिका) तरी ते शास्त्र असू शकते असे आम्ही मानू, अशी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन नागपूर समितीने पुणे, धुळे, अमरावती या चारही अ. भा. ज्योतिष अधिवेशनात जाहीर आव्हाने दिली होती. ती आव्हाने स्वीकारून आपली बाजू सत्य असल्याचे ज्योतिष महामंडळ का सिद्ध करू शकले नाही? याचा अर्थ, फलज्योतिष शास्त्र नाही असाच घ्यायचा का?

Thursday, May 23, 2013

शिर्डीचा समूहउन्माद

नगरहून कोपरगावला जाताना रहाता गाव ओलांडलं तशी शिर्डीची चाहूल लागू लागली.आधी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्मोठी हॉटेल्स , रिसॉर्टस, त्यातही त्यांची नावं अपेक्षेप्रमाणं साईलीला, साईरंग अशी. बाकीच्या देवस्थानांच्या मानानं ही भलतीच झकपक आणि पंचतारांकित.रस्त्यावर भरधाव चालणाऱ्या परप्रांतातल्या नवीन गाड्या आणि त्यावरचे भलेमोठे फुलांचे हार.
शिर्डीचं बसस्थानक ओलांडून पुढं आले तसा शेजारी बसलेल्या राजेंनी हात जोडून , डोळे घट्ट मिटून नमस्कार केला. शिर्डी सोडून बरेच पुढे आलो तरी राजेंचे हात जोडलेले आणि डोळे मिटलेलेच होते.
संध्याकाळी परत येताना शिर्डीत थांबलो. सहा वाजताच्या आरतीचे व्हीआयपी पास मिळवण्याची राजेंनी व्यवस्था केली होती. असा पास (फुकट) मिळवण्यासाठी स्पेशल कॉन्टॅक्ट्स असावे लागतात असे राजे अभिमानानं म्हणाले. संस्थानाच्या काही लोकांनी असे पासेस बाहेर दोन्दोन हजार रुपयांना विकले आणि त्यांचं एक भलंमोठं रॅकेट पकडलं गेलं असे ते म्हणाले.
हॉटेलमधल्या बऱ्याचशा खोल्या आंध्र प्रदेशातून आलेल्या भक्तांनी भरलेल्या होत्या.त्यात दोन पाच वर्षांची काही लहान मुलंही होती. काही लहान मुलांच्या डोक्याचं पूर्ण मुंडन केलेलं होतं. डोक्याची आगाआग होत असल्यानं ती मुलं अखंड रडत होती. त्यांच्याबरोबरचे बाप्ये आणि बाया त्यांच्यावर हेंगाड्या भाषेत खेकसत होत्या. आंध्रातल्या लोकांनी हा काहीतरी नवीन चावटपणा सुरु केला आहे, असं राजे म्हणाले.
साडेपाच वाजता हॉटेलातून मंदिराकडे जायला निघालो. व्हीआयपी पासमुळं फक्त मंदिराच्या गाड्यांनाच प्रवेश असलेल्या राखीव प्रवेशद्वारातून आत गेलो. आतल्या बांधकामाच्या पाटीवर व्यवस्थापक मंडळीत अजित पवार असं एक नाव वाचून हे राजकारणी आता इथं पण का असं मी राजेंना विचारलं. तेंव्हा हे वेगळे आणि ते वेगळे असे राजे म्हणाले. या अजित पवारांनी देवस्थानाच्या विकासासाठी फार प्रयत्न केले, पण ते नंतर शिर्डीच्या राजकारणात पडले, आणि मग इथल्या लोकल मंडळींनी त्यांना सरळ केलं असंही त्यांनी सांगितलं. 
सहा वाजत आले तशी गर्दी वाढू लागली. ‘स्पेशल कॉन्टॅक्ट्स ‘ वापरून आलेल्या भक्तांचे कपडे आणि रुबाब बाकीच्यांपेक्षा वेगळाच दिसत होता. त्यातल्या मध्यमवयीन बायका टीव्ही सीरीयलसारखा संपूर्ण मेकअप करून आल्या होत्या. दोनतीन तरूण मुली तंग टी शर्टस आणि जीन्स घालून आल्या होत्या.रांगेतले लोक वळूनवळून त्यांचाकडं बघत होते. एका मुलीच्या टी शर्टवर ‘खरंतर तुम्हाला माझं तीव्र आकर्षण वाटत आहे, तर मग ते लपवता कशाला ‘ अशा आशयाचं इंग्रजीत लिहीलेलं होतं. पण तेही बाबांच्या संदर्भात असावं असं समजून मी गप्प राहिलो.तेवढ्यात राजे येऊन माझ्या कानात ‘लुक ऍट दोज बिचेस. दे हॅव कम फॉर द दर्शन ऑफ बाबा ऑर गिव्ह देअर दर्शन टू अदर बाबाज ‘ असं कुजबुजले.
मंदिराचं दार उघडलं तसे संगमरवरी पायरीवरून व्हीआयपी आत घुसले‌. स्टेनलेसस्टीलच्या जाड नळ्यांच्या रेलिंगचं छोटं गेट अजून बंदच होतं.तिथून पुढं संपूर्ण चांदीच्या पार्श्वभूमीवर बाबांची संगमरवरी मूर्ती दिसत होती. तेवढ्यात मागून जनता गेट उघडलं आणि प्रचंड पळापळ सुरु झाली. काही मिनिटातच पूर्ण मंडप भरून गेला.मंदिरातला धुपाचा वास, धूर, बाबांची चकचकीत मूर्ती, त्यांच्या डोक्यावरील सोन्याचा मुगुट, त्यावरचं सोन्याचं छत्र, क्लोज सर्किट टीव्हीमधून मागे दूरवर दिसणाऱ्या  बाबांच्या असंख्य प्रतिमा आणि प्लेअरवर वाजणारा एकसंध खर्जातला ओम साईनाथाय नमः असा जप यानं वातावरण एकदम संमोहित झाल्यासारखं झालं. तेवढ्यात भालदार चोपदारांसारखा गणवेश घातलेले आणि हातात चांदीचा मानदंड घेतलेले दोन पगडबंद बाबांच्या मूर्तीसमोर येऊन उभे राहिले. पेटी-तबला असा सरंजाम होताच. माइकसमोर येऊन एका तरतरीत चष्मावल्या पुजाऱ्यांनी सराईतपणे आता आरती सुरु होत आहे, सर्वांनी एकसाथ आरती म्हणावी, आरती चालू असताना फोटो काढू नयेत असं आळीपाळीनं मराठी व हिंदीतून सांगितलं. तेवढ्यात आमच्याही पुढं असलेलं एक अतिअतिविशिष्ट लोकांसाठीचं दार उघडलं आणि त्यातून चारपाच लोक आत घुसले. त्यात एक सिनेमानटासारखा दिसणारा लाल रंगाची जर्सी घातलेला तरुण होता. आपल्याला आरतीला उशीर झाला की काय या कल्पनेने तो घाबराघुबरा झाल्यासारखा वाटत होता.
तेवढ्यात आरती सुरु झालीच. माझ्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या झांजवाल्यानं इतक्या जोरात झांज वाजवायला सुरुवात केली की मी दचकलोच.बऱ्याच लोकांकडे आरतीचं छोटं पुस्तक होतं. पण लोकांना चालीचा अंदाज नसल्यानं ते थोडेथोडे चुकत होते. माझ्या समोरच्या लाल जर्सीवाल्यानं सिनेमातले भक्त देवापुढं गाणं म्हणताना जसे हात फैलावून धरतात तसे धरले होते. मधूनच तो कॅच पकडल्यासारखंही करत होता. माझ्या शेजारचा तुळतुळीत डोक्याचा तरुण आपल्या गालावर तौबा तौबा करताना मारून घेतात तसं सरळ आणि उलटं मारत होता.आरती संपून अचानकच ‘घालीन लोटांगण..’ सुरु झालं आणि लोक स्वतःभोवती फिरायला लागले. हात व डोळे जोडलेली असंख्य मानवी सिलींडर्स एखाद्या राक्षसी यंत्राच्या सुट्या भागांसारखी दिसत होती. नेमक्या किती गिरक्या घ्यायच्या याचा अदमास नसल्यानं काही लोक मध्येच थांबले होते. त्यांना शेजारच्याचं डोकं, कोपर लागल्यावर ते वैतागत होते.
आरती संपली आणि दहा कडव्यांचं एक साईस्तोत्र सुरु झालं. प्रत्येक कडव्याची सुरुवात पुसो न आम्हा अमुकतमुक अलाणाफलाणा न पुसो तरीपण साईनाथ आमच्यावर न रुसो अशी होती. त्यातल्या पुसो आणि रुसो या शब्दांची गंमत वाटून ते स्तोत्र मी पूर्ण बघीतलं. पुढेपुढे पुसो मधल्या गोष्टी संपल्यानं डसो – नसो – ठसो अशी जुळवाजुळव केली होती.
आता बराच वेळ झाला होता. मागं एक्दोन मुलं रडण्याचा आवाज येत होता. पगडबंद परत एकदा ललकारी दिली आणि बाबांचा मुगुट आणि चांदीचे दंड बंदोबस्तात आत पाठवले.मुगुट काढल्यावर आतल्या केशरी वस्त्रात बाबा अगदी घरगुती दिसू लागले. आता दर्शनाची लैन सुरु झाली. हिरवं वस्त्र पांघरलेल्या समाधीवर दोन्ही बाजूला हात टेकवून लोक डोकं, गाल समाधीवर घासत होते. लाल जर्सीवाल्यानं समाधीच्या दोन्ही बाजूला हात रोवून धरले आणि उभ्याउभ्या तो सूर्यनमस्कार घातल्यासारखं करू लागला. राजे त्या समाधीला आलिंगन दिल्यासारखे जे आडवे झाले ते उठेतनाच. मागचे लोक कुरकुर करू लागले तसे राजे नाइलाज झाल्यासारखे उठले , एखादं पाऊल पुढं आले आणि परत झटका आल्यासारखे समाधीवर जाऊन आडवे झाले. पुजाऱ्यानं त्यांना डोक्याला धरून उठवलं तसे ते नाइलाज झाल्यासारखे उठले.
आम्ही मंदिराच्या बाहेरच्या कट्ट्यावर येऊन बसलो. राजेंच्या चेहऱ्यावरून समाधान निथळत होतं. काही जाणवलं की नाही तुला, का नुसताच पुतळ्यासारखा उभा होतास? त्यांनी मला जाब विचारल्यासारखं विचारलं. काही नाही बुवा, मी म्हणालो. राजे एकदम चिडल्यासारखे झाले. चूक केली तुला इथं आणून, ते म्हणाले. हे बघा, तुम्हाला बरं वाटावं म्हणून आहे हं काहीतरी असं मी म्हणू शकलो असतो, मी म्हणालो. पण तुम्ही मानता त्या पवित्र ठिकाणी खरं बोलणं जास्त योग्य आहे. राजे जास्तच वैतागल्यासारखे झाले. थोड्या वेळाच्या शांततेनंतर म्हणाले, कसे रे अश्रद्ध तुम्ही, घरात संध्याकाळी दिवा तरी लावता का देवासमोर? माझ्या घरात देवघर नाही हो, मी अपराधीपणानं म्हणालो. कर, एक देवघर, किमान एक फोटो लाव महाराजांचा, आणि दिवा लावत जा रोज संध्याकाळी त्याच्यासमोर. मग बघ तुला कसं शांत आणि समाधानी वाटेल ते. ते म्हणाले.
अहो, पण असलं काही न करताच मला शांत आणि समाधानी वाटतंय, मी म्हणालो.
बघ, मी म्हणालो नव्हतो का की तुला कसला तरी दृष्टांत होईलच म्हणून, राजे विजयी हसले.
मी गाडी सुरु केली. झांजेच्या आवाजानं एक कान बधीर झाला होता. मनाशी म्हणालो, दोन्ही कान बधीर झाले तरी चालेल, कानांच्या मधला भाग बधीर न होता शाबूत राहो, की वाचलो!
-इंटरनेटवरून