*अंधश्रद्धा निर्मूलन*
(1) स्त्री-पुरुष/मुलगा-मुलगी दोघेही शक्ती बुध्दीच्या बाबतीत सारखेच असतात.
(2) मंत्र, तंत्र,नवस, बळी, प्रसाद यामुळे मुल होणे, मुलीचा मुलगा होणे या गोष्टी कधीही शक्य नाहीत
(3) "अंगात येणे" हे देवीमुळे शक्य होत नाही, तो मानसिक आजार, संमोहनाची एक अवस्था किंवा ढोंग आहे.
(4) कोणाकडेही दैवी शक्ती नसते.
(5) कोणताही चमत्कार, भौतिक अथवा रासायनिक विज्ञानांमधल्या तत्वावर आधारलेला असतो किंवा हातचलाखीने केलेला असतो.
(6) कोणालाही कोणतीही गोष्ट हवेतून काढता येत नाही.
(7) चमत्कार करुन कोणाचीही फसवणूक करणे हा गुन्हा आहे.
(8) मंत्र, तंत्र, ताईत, अंगारा, गंडे, दोरे, उतारा यांनी कोणताही आजार बरा होत नाही.
(9) आकाशातील ग्रह ताऱ्यांचा मानवावर कोणताही परिणाम होत नाही.
(10) आपले भविष्य आपल्या मनगटात असते, आपण आपले भविष्य बनवू शकतो.
(11) ज्योतिष हे विज्ञानासारखे शास्त्र नाही.
(12) भानामतीमुळे घरातील वस्तू धडपडतात, डबे फळीवरुन खाली पडतात, वस्तू घराबाहेर फेकल्या जातात, कपडे फाटतात, कपडे पेटतात, पिठात राख मिसळते, अन्नात वाळू पडते, अंगावर बिब्बाच्या फुल्या उमटतात. घरावर लिंबू, दगड पडतात. भानामतीमुळे अशा काही गोष्टी घडतात असे लोक समजतात परंतु ते खरे नाही.
(13) या जगात कोणतीही अतींद्रिय शक्ती नाही.
(14) भानामती घरातील मानसिकदृष्ट्या विकृत व्यक्ती घडवत असते.
(15) बाह्य प्रेरणेशिवाय जागची वस्तू हलत नाही.
(16) करणी, मुठ, भानामती या गोष्टी खोट्या आहेत.
(17) निसर्गात घडणारी कोणतीही घटना शुभ किंवा अशुभ नसते.
(18) "नवस करुन हवे ते मिळविता येते" हा गैरसमज आहे.
(19) नवस फेडण्याच्या प्रयत्नात माणसाचे आर्थिक, शारीरिक नुकसान होते.
(20) स्वत:च्या प्रयत्नाने आपण आपली प्रगती करु शकतो. आपले भविष्य आपल्या हातात म्हणजे प्रयत्नात असते.
(21) माणूस मेल्यानंतर त्याची राख होते किंवा माती होते, भूत होत नाही.
(22) भूत ही एक कल्पना आहे. ते सत्य नाही.
(23) निर्भय होऊन, धीट होऊन चिकित्सा करणे आवश्यक आहे.
(24) साप, नाग आपली दैवते नाहीत, पण मित्र आहेत.
(25) आपल्याकडे आढळणारे बरेच साप बिनविषारी असतात, फक्त नाग, मण्यार, घोणस, फुरसे या जातीचे साप विषारी असतात.
(26) विषारी साप चावल्यास दाताच्या दोन खुणा उमटतात.
(27) विषारी साप चावल्यास त्या व्यक्तीला प्रतिविषाचे इंजेक्शन घेण्यासाठी सरकारी दवाखान्यात न्यावे, इतर कोणत्याही उपायाने विष उतरत नाही.

No comments:
Post a Comment