Showing posts with label प्रा.य.ना.वालावलकर. Show all posts
Showing posts with label प्रा.य.ना.वालावलकर. Show all posts

Thursday, October 22, 2015

गुरुविण कोण लावितो वाट ?

बर्‍याच वर्षांपूर्वीचा काळतेव्हा आम्ही शालेय विद्यार्थी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमच्या वर्गावर पहिल्या तासाला येणार्‍या गुरुजींना फुलें देऊन नमस्कार करीत असूसर्व गुरुजींचा पहिला तास कुठल्या ना कुठल्या वर्गावर असायचात्यामुळे त्यादिवशी सर्व गुरुजनांचे पुष्पपूजन होईतसेच गायनवादननृत्य अशा कला क्षेत्रांतील गुरूंचे त्यांचे शिष्य पूजन करीतत्याकाळी गुरुपौर्णिमेचा संबंध शिक्षकांच्याकलातपस्वींच्याज्ञानमहर्षींच्या सन्मानाशी होताते दिवस गेले.




संगीत, नाट्य, नृत्य, शिल्प अशा कलाक्षेत्रात गुरूंचे महत्त्व अजून टिकून आहे.कारण या कला गुरूकडूनच ग्रहण कराव्या लागतात. तिथे निवडक शिष्य असतात. आध्यात्मिक क्षेत्रात ठकसेन गुरूंचा सुळसुळाट झालेला दिसतो. कांही खरे सद्गुरू असतात. पण आजच्या जाहिरातींच्या कल्लोळात आणि झगमगाटात ते दिसेनासे झाले आहेत. गावोगावी मेळावे भरवून खरे सद्गुरू आपली भक्तसंख्या वाढविण्याच्या मागे नसतात. त्यांना प्रसिद्धीची आणि संपत्तीची हाव नसते. शिष्यांनी गुरूंचा शोध ध्यावा अशी अपेक्षा असते. पण आजच्या धावपळीच्या जीवनात सगळ्यांना झटपट रेडिमेड हवे असते. त्यासाठी ते पैसे मोजायला तयार असतात.आपल्याला हवे तें ठकसेन गुरूंकडून मिळेल असे त्यांना वाटते. कारण ते जाहिरातींना बळी पडतात. असे भक्त त्यांच्या कच्छपी लागतात. ठकसेनांचा धंदा फोफावतो. आजच्या मार्केटिंच्या युगाचा हा अपरिहार्य परिणाम आहे. खरे सद्गुरू आणि भक्त यांची संख्या आता नगण्य झाली आहे असे दिसते. त्यांचा विचार या लेखात नाही. श्रद्धाळूंनी ठकसेनांच्या नादी लागून फसू नये, हा या लेखाचा हेतू आहे.


आता गुरुपौर्णिमा म्हणजे आध्यात्मिक गुरूंच्या पूजनाचा (आणि त्या गुरूंनी भक्तांकडून दक्षिणा लाटण्याचा) दिवस असा अर्थ रूढ झाला आहेपूर्वी दैवी शक्तीचे चमत्कार करून दाखविणार्‍या बुवा,महाराजस्वामीबाबा यांची संख्या मोठी होतीपुढे अनेक बुवा-बाबांच्या "लीलाउघड झाल्यात्यांचेदैवी चमत्कार म्हणजे हातचलाखीचे प्रयोग हेही लक्षात येऊ लागलेत्यामुळे चमत्कारी बुवा बदनाम झालेपण एखादी दहशतवादी संघटना जशी जुने नाव बदलून नव्याने आपली स्फोटक कृत्ये चालू ठेवतेत्याप्रमाणे बुवा--बाबांनी आध्यात्मिक गुरू हे नाव धारण करूनआपली कार्यपद्धती बदलून,श्रद्धाळूंना फसवण्याचे आपले मूलभूत मह्त्कार्य पुढे चालू ठेवले. "हृदयीं गुरु नांदे। फसवुनी घेऊं आनंदे॥या मनोवृत्तीचे श्रद्धाळू भक्त त्यांना मोठ्या प्रमाणात लाभलेगुरुबाजी का फोफावते यासंबंधी"उदासबोधया कवितासंग्रहात मंगेश पाडगावकर म्हणतात,:

" प्रत्येकासी येथे हवा । कोणीतरी जबरा बुवा।जो काढील सार्‍या उवा । मनातल्या चिंतेच्या।
आपण शोधायचे नाही । आपण लढायचे नाही।आपण भिडायचे नाही । आयुष्याला।
येक गुरू फार मोठा । अध्यात्मधंद्या नाही तोटा। तो आपुल्या धोतरा कासोटा । वर्ज्य मानी।
असल्या आध्यात्मिक गुरूंचे स्तोम आज सर्वत्र माजलेले दिसतेभक्तांची संख्या अमाप आहेबहुतेक आध्यात्मिक गुरु हे प्रच्छन्न ठकसेन असतातशिष्यांना फसवूनआपल्या भजनी लावून त्यांचे आर्थिक शोषण करणे हे त्यांचे उद्दिष्ट असतेआसाराम,रामपाल, नित्यानंदनिर्मलबाबावेंकटसर्वानन अशा अनेक गुरूंचे ढोंग उघड झालेखरे स्वरूप समजलेतरी अशा ठकसेन गुरूंच्या कच्छपीं लागणारे भोळसट भाविक आहेतचपरब्रह्मपरमात्माजीवात्मापुनर्जन्ममोक्षब्रह्मलोकअसे शब्द कानी पडल्यावर ते श्रद्धाळू भारावून जातातत्यांना भुरळ पडतेगुरूवरील श्रद्धा दृढ होते.दुसर्‍या प्रकारच्या कांही गुरूंना वाटतेकी अध्यात्मशास्त्राचा आपला परिपूर्ण अभ्यास आहेआपण साक्षात्कारी आहोआपल्याला आत्मज्ञान प्राप्त झाले आहेआपल्यापाशी दिव्य अलौकिक शक्ती आहे,भक्ताच्या डोक्यावर हात ठेवून आपण शक्तिपात करू शकतोज्ञानसंक्रमण करू शकतोअशा कल्पनेच्या राज्यात जे वावरतात ते भ्रमसेन गुरू होतकुणाला फसवण्याचा त्यांचा हेतू नसतोअशाभ्रमसेन गुरूंत काहीजण सज्जनसदाचारीसत्पुरुष असू शकतातमात्र दिव्य ज्ञानअलौकिक शक्ती कुणापाशी नसतेखरेतर अशा शक्तीला अस्तित्वच नाहीनिसर्गनियमांचे अतिक्रमण कोणीही करू शकत नाही.काही गुरू निष्पापअश्रापनिरिच्छनिर्मोही असतातत्यांचे भक्त त्यांना विदेहीजीवन्मुक्तदेहातीत,अवलियापहुंचा हुवा आदमी असे समजतातत्यांच्या भजनी लागतातत्या गुरूंना आपल्या शरीराचे,कपड्यांचेखाण्या-पिण्याचेस्वच्छतेचे भान नसते..." हे इतके लोक माझ्यापुढे असे हात का जोडताहेतगाणे कसले म्हणताहेतसमोरच्या पेटीत पैसे का टाकताहेत?..." हे त्यांना काही समजत नसतेखरे तर ते मतिमंद असतातकाही धूर्त लोकांनी त्यांना गुरू बनवून मठात बसवलेले असतेहे मूढसेन गुरू होतअशा या आध्यात्मिक गुरूंच्या तीन तर्‍हा (ठकसेन, भ्रमसेन, मूढसेन) दिसतात.गुरू ठकसेन असोभ्रमसेन असो वा मूढसेन असो प्रत्येकाचा भक्तवृंद असतोचत्यांत ठकसेन गुरू साधनशुचिता गुंडाळून ठेवून आपल्या धंद्याचे व्यवस्थापन पद्धतशीरपणे करत असल्याने भाविकांवर त्यांचा प्रभाव अधिक पडतो आणि त्यांना मोठ्या संख्येने शिष्य लाभतातसर्व गुरूंचे शिष्य आपली बुद्धी गुरुचरणी वाहातात आणि गुरूंना सर्वभावे शरण जातातअशा भक्तांविषयी पु..देशपांडे यांनी एक अप्रतिम भक्तिगीत लिहिले आहेबहुतेकांनी ते वाचले असेलते दत्तगुरूंविषयी असले तरी सर्वच गुरुभक्तांना आवडेल आणि मुखोद्गत करावेसे वाटेल म्हणून इथे दिले आहे.
गुरुराज मन्मनीं बसले । हृदयात माझिया ठसले ।
श्वान सुलोचन अहा गोजिरे । जवळी बसता दिसे साजिरे
झोळीमधला प्रसाद मिळता । स्वपुच्छ हलवित हसले । गुरुराज मन्मनीं बसले ।..त्या श्वानाचा वाटे हेवा । कधी सुखाचा मिळेल ठेवा
गुरुचरणांच्या ठायीं मजला । सात स्वर्गही दिसले । गुरुराज मन्मनीं बसले ।...

खरेतर हे सर्व आध्यात्मिक गुरू म्हणजे सामान्य माणसे असतातत्यांतील कोणापाशी दैवी शक्ती,अलौकिक सामर्थ्यदिव्य ज्ञान असले काही नसतेगीतेतील श्लोकधर्मग्रंथांतील वचनेपुराणांतील दाखलेसंतसाहित्यातील अभंगओव्या यांतील काही गोष्टी हे गुरू (मूढसेन सोडूनतोंडपाठ करतात.बरेचसे वाचलेलेऐकलेले असतेवक्तृत्व प्रभावी असते...."ब्रह्मस्वरूप गोमातेच्या महन्मंगल मुखातून उद्भूत झालेला पवित्रतम गहनगूढ गायत्री मंत्र सर्वतोभद्र आहेतो शिवस्वरूप असून धवलवर्णी आहे.त्या महामंत्राच्या जपाचे रहस्य पुरंजनाने रंतिदेवाला कथन केले तेव्हा त्याचा आत्मा देहमुक्त होऊन अर्चिमार्गे ब्रह्मलोकी प्रवेश करून शाश्वत अशा चिदानंदात तरंगू लागला." असले गुरुमुखातून येणारे अगम्य बोल ऐकले की श्रद्धाळू भक्त मंत्रमुग्ध होतातमाना डोलावू लागतातगुरुवचन सत्य मानायचे.त्याची चिकित्सा करायची नाही. " गाईचे मुख महन्मंगल कसे? " अशी शंका विचारायची नाही.भक्तांच्या या श्रद्धाळू वृत्तीमुळे जटाधारी-गोटाधारीटिळाधारी-माळाधारीकफनीधारी-लुंगीधारी असे सर्व गुरू इथे प्रभावी ठरतात.गुरूमुळे भक्तांची आर्थिक हानी होतेवेळ आणि ऊर्जा यांचा अपव्यय होतोपण सर्वांत गंभीर गोष्ट म्हणजे त्यांची बुद्धी पांगळी होतेभक्त आपल्या गुरूला सर्वभावे शरण जातोगुरूचा शब्द प्रमाण मानतोगुरू जे सांगेल ते पूर्ण सत्य असणार हे गृहीत धरतोगुरुवचनांची चिकित्सा करणेत्यांवर शंका घेणे पाप समजतोगुरूचे विचार हे आपलेच विचार आहेत असे त्याला वाटतेतो स्वबुद्धीने स्वतंत्रपणे विचार करू शकत नाहीआपली बुद्धी गुरूच्या पायी गहाण ठेवतोदुसर्‍याच्या आहारी जाऊन त्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे म्हणजे स्वत्व हरवून बसणेदास्य स्वीकारणेशरणागती पत्करणेहा माणूसपणाचा अपमान आहेपण भक्तांना त्यात धन्यता वाटतेमूढसेन गुरूचे भक्त त्याच्या कृपा कटाक्षासाठी आसुसलेले असतातगुरूने त्यांच्याकडे पाहिलेआशीर्वाद दिल्यासारखा हात वर केला की भक्ताला धन्य धन्य वाटतेगुरूने कधी थप्पड मारली तर आता आपल्या मोक्षाचा मार्ग मोकळा झाला असे वाटून भक्त कृतार्थ होतोम्हणजे अशा मतिमंद गुरूपुढे भक्ताची पूर्ण शरणागती असतेगुरुपायाशी बुद्धी गहाण असते.आध्यात्मिक गुरुविषयीं एक जुना किस्सा आहेमुळात तो एक संस्कृत श्लोक आहेत्याला कुणी मराठी दिलेत्या आधारे हा किस्सा लिहिला आहे.

"नमस्कार महाराजआपल्या या कफनीला मोठा झोळ पडलेला दिसतोतसेच त्यात लहान लहान छिद्रेही आहेत."
खरे आहेनदीत आंघोळ करताना अशा कफनीचा उपयोग मी मासे पकडण्यासाठी करतो."
"
मासेम्हणजे तुम्ही मासे खातामत्स्याहारी आहांत? "
"
होतळलेले छोटे मासे दारूबरोबर छान लागतातआपला काय अनुभव?"
"
दारूम्हणजे मद्यपानसुद्धा करता?"
"
व्यसन नाहीपण कधी बाईकडे जायचे तर आधी एखादी बाटली पिणे बरेआपला काय अनुभव?"
"
बाप रेबाईम्हणजे वेश्यागमन?"
"
आश्चर्य कसले त्यातअहोजुगारात एखादे वेळी एकदम घबाड लागले तर मौज मजा करावीशी वाटणारच ना?"
"
 म्हणजे तुम्ही जुगारी अड्ड्यांवर पण जाता? "
क्वचित कधीतरीबाकी वेळ कुणाला असतोआमच्या मठात सतत गर्दी असते भक्तांचीत्यांना दर्शन देण्यात आणि मार्गदर्शन करण्यात खूप वेळ जातो."
समजले.तुम्ही आध्यात्मिक गुरू आहांत तर नमस्कारनिघतो मी."
हा किस्सा जुना झालाआता या गुरूंची जीवन पद्धती (लाईफ स्टाईलखूप बदलली आहेतरी मूळ मनोवृत्ती तशीच आहेअशा या गुरूंचे श्रद्धाळू भक्त व्यासपौर्णिमेला पूजन करतात हे आपल्या समाजाचे दुर्भाग्य होय.
-प्रा..ना.वालावलकर

Friday, November 14, 2014

सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक

हा अनुभव खूप वर्षांपूर्वीचा आहेआठवला तसा लिहिला आहेत्याकाळीं नोकरीनिमित्त कोकणात वेंगुर्ले गावी होतोतिथे विजय कर्णिक नावाच्या तरुणाशी परिचय झालात्याने एकदा गोवा-कारवार-जोग धबधबा अशा पर्यटनस्थळांची सहल आयोजित केली होतीएक मिनिबस ठरवलीत्यांतील काही जागा रिकाम्या राहिल्या म्हणून त्याने मला विचारलेसहल तीन दिवसांची होतीसगळी माहिती घेऊन मी हो म्हटलेपैसे भरलेनियोजित दिवशी सहल निघालीसहलीला नऊ जोडपी आणि पाच एकटे (मी धरूनअसे तेवीस पर्यटक सहभागी होतेसर्व तिशी-पंचविशीतील उत्साही तरुण मंडळी होतीपणजीला पोहोचेपर्यंत सर्वांची परस्परांशी ओळख झालीसमूह (ग्रुपचांगला होता.
प्रत्येक सहलीत मंदिरेदेवस्थानेतीर्थक्षेत्रे यांचा समावेश पर्यटन स्थळांत असतोचआम्ही एका मंदिरात गेलोदेऊळ भव्य नव्हते तसेच फार पुरातनही नव्हतेसर्वांबरोबर मीही आत गेलोमूर्ती संगमरवरी दगडाची होतीकाळ्या दगडातील कोरीव शिल्प नव्हते.कोरीव शिल्पांची निरीक्षणे करणे मला आवडतेभाविकांनी मूर्तीला हात जोडलेनतमस्तक होऊन नमस्कार केलापेटीत दान टाकले.प्रसाद घेतलामी यातले काही केले नाहीसगळे पाहिलेइतरांसोबत प्रदक्षिणा घातलीबहुतेक सहप्रवाशांच्या हे लक्षात आले असावे.बसमध्ये बसल्यावर शेजारच्याने विचारले,
तुम्ही देवाला नमस्कार केला नाहीप्रसाद घेतला नाहीअसे का ?"
मला तसे करावेसे वाटले नाहीकधीच वाटत नाहीम्हणून. "
"कुठल्याच देवाला नमस्कार करीत नाही का ?"
होकुठल्याच देवाला नाही."
थोडा वेळ शांततेत गेलापुन्हा त्याने प्रश्न विचारला.
मग मंदिरात कसे आला ?"
तुमच्यासारखाचबस मधून उतरलोचालत चालत देवळात आलो."
तसे नव्हेनास्तिक आहात तर मंदिरात का आला?"
"नास्तिकांना देवळात यायला बंदी आहे कातशी पाटी कुठे दिसली नाहीअसोगमतीने विचारलेमूर्तीचे शिल्प पाहायचेदर्शनालाआलेले भाविक काय करतातपुजारी काय करतातकाय बोलतात ते पाहायचेऐकायचे या हेतूने आलो.
"नमस्कार न करणे हा अहंकार आहे असे वाटत नाही का ?"
मी देवाला नमस्कार केला नाही हे त्याच्या मनाला थोडे लागले असावेसगळ्यांनी देवाला नमस्कार करायलाच हवा असेही त्याला वाटत असावे.
"नाहीयात अहंकाराचा प्रश्न नाहीनिर्जीव मूर्तीला हात जोडणे मला असमंजसपणाचे वाटते म्हणून मी तसे करीत नाहीमाणसांनानमस्कार करतो."
देवाला नाही आणि माणसांना का बरे?"
"कारण मी नमस्कार केला हे देवाला समजत नाहीमाणसांना समजतेत्यांना भावना असतातत्या दुखावू नये असे मला वाटते.देवापुढे मी नतमस्तक झालो नाहीत्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा निरुपाय आहे."
"तुमच्याशी बोलण्यात कांही अर्थ नाही." सहप्रवासी थोडा रागावला.
"जशी तुमची इच्छामी म्हणालो.
थोडा वेळ आम्ही दोघे गप्प राहिलोनंतर काही निमित्ताने मी दुसरा विषय काढलापरत गप्पा सुरू झाल्यादुसर्‍या दिवशी आणखी एका मंदिराला भेट दिलीतिथे पहिल्याचीच पुनरावृत्ती झालीमूर्ती वेगळीती अधिक रेखीव आणि सुबक होतीपुरोहित वेगळेबाकीसगळे तेच.
तिसरे मंदिर कारवारचेते मोठे सुप्रसिद्ध प्राचीन देवस्थान होतेतिथे कांही जणांनी देवाला अभिषेक केलानंतर सर्वांनी (मी सोडून )देवस्थानला देणग्या दिल्याएकूण तेरा पावत्या फाडल्याआम्ही हॉटेलवर परतलोते जवळच होतेकाही वेळाने देवस्थानचा एक माणूस प्रसादाचे लाडू घेऊन हॉटेलवर आलामी देणगी दिली नव्हतीतरी माझ्यासाठीसुद्धा लाडू आणला होतामी नम्रपणे प्रसाद नाकारला. " क्षमा करामी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही." असे सांगितलेत्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिलेमीनाकारलेला प्रसादाचा लाडू आणि देणगीचे पावती पुस्तक पिशवीत भरलेआणि तो तिथून निघालामाझे वागणे सहपर्यटकांना आवडले नाहीएकाने तसे बोलूनही दाखवले.
दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोसगळे वेळी आलेबस चालू झालीहवेत गारवा होतावातावरण छान उत्साहवर्धक होतेअजून सूर्योदय व्हायचा होता. " ठरल्याप्रमाणे आपली सर्व ठिकाणे पाहून झालीकुठे काही अडचण आली नाही.तुम्ही सर्वांनी चांगले सहकार्य दिलेसर्वांचे आभार." विजय कर्णिक म्हणालात्याने सहलीचे आयोजन केले होतेआपली जबाबदारी चांगल्या तर्‍हेने पार पाडली होती.
"आपली ट्रिप छान झाली." कोणी तरी मनापासून आनंदानेउत्स्फूर्तपणे बोलला.
बसमध्ये सर्व तरुण मंडळी होतीसारेजण उत्साहातआनंदात होतेहास्यविनोद चालले होतेसकाळचे अकरा वाजले असतील.एकदम धक्का बसल्यासारखे होऊन बसचे इंजिन बंद पडलेतेवढ्यात चलाखीने ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला घेतलीआणि ती थांबलीचवाहक(ड्रायव्हर ) आणि त्याचा मदतनीस खाली उतरलेकाही ठाक-ठूक करू लागलेवीस मिनिटे गेलीबस चालू होईना.प्रवाशांचा उत्साह मावळलाअस्वस्थताचुळबुळ सुरू झालीएक बाई मला उद्देशून म्हणाल्या,
"तुम्ही तो प्रसादाचा लाडू नाकारायला नको होताप्रसाद ग्रहण न करण्याचे काय परिणाम होतात ते तुम्हाला ठाऊक नाही काय?सत्यनारायणाची कथा तुम्ही कधी ऐकली नाही काय ?"
ती कथा मी अनेकदा ऐकली आहेतसेच पोथीसुद्धा स्वतवाचली आहेसत्यनारायण पोथीतील सर्व कथा असत्य आहेत हे कॉमनसेन्स वापरला तर सहज लक्षात येतेवंगध्वज राजासाधुवाणीअसल्या कथा केवळ श्रद्धेनेच ऐकायच्या का त्यांवर कधी विचार करायचाच नाही का आपल्या पूजेचा दिलेला प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजेभक्षण केलाच पाहिजे असा या देवाचा हट्ट का असावा कोणी प्रसाद घेतला नाहीखाल्ला नाही तर या देवाचा एवढा अपमान होतो की देवाने त्या प्रसाद न खाणार्‍याला मोठी शिक्षा द्यावी राजाने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याच्या पुत्रांना मारायचे ? हा देवाघरचा न्याय का देव इतका सूडकरी कसा ?एवढ्या क्षुद्र मनाचा कसा या व्रताविषयी खूप काही सांगण्यासारखे आहेपण नकोवेळ जाईल."
आता गाडी मार्गीं लागेपर्यंत वेळ घालवायलाच हवा.एक बाई बोलल्या.
"ठीक आहेऐकणार असाल तर थोडे सांगतोसत्यनारायण पोथीच्या प्रत्येक अध्यायाशेवटी -इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे...-असे लिहिले आहेपण ही पुराणकथा नाहीशिवकालीन कागदपत्रांत या व्रताचा कुठेही उल्लेख नाहीछत्रपतींना असली व्रत-वैकल्ये करण्यास वेळच नव्हता म्हणानंतरचे पेशवे तर मोठे देवभक्त होतेपण पेशवेकालीन कागदपत्रांतही या व्रताचे नाव कुठे नाही.बंगालमधील मुसलमानांच्या साचापीर उत्सवावरून हे सत्यनारायण व्रत इ.१८८०च्या सुमारास इकडे आलेयाविषयी इतिहासकारांचे एकमत आहेसध्या बंगाल आणि महाराष्ट्र या दोनच राज्यात सत्यनारायण पूजा करतातहे व्रत पौराणिक असते तर उत्तर भारतात रूढ झालेच असतेतसेच विष्णुसहस्रनामात सत्यनारायण हे नाव नाही. "
"आम्ही हे कधी कुठे वाचले नाही की ऐकले नाही."कांही पर्यटक म्हणाले.
"खरे तर हा इतिहास ठाऊक नसला तरी ही कथा ऐकताना एवढे कशाला -जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा-ही आरती ऐकताना अर्थ समजून घेतला (भाषा सोपी आहेअर्थ सरळ आहे.) तर अथ ते इति सगळे असत्य आहे हे आपल्यासारख्यांना सहज कळू शकते.पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होतेश्रद्धा ही मनोभावना आहेभावनेवर बुद्धीचे नियंत्रण असेल तरच सत्य कळू शकते."
ठीक आहेपण प्रसाद नाकारायचा कशाला तुम्ही देणगी दिली नव्हती तरी त्याने तुमच्यासाठी अगत्याने प्रसाद आणला होता."माझ्या शेजारी बसणारा बोलला.
त्याच्या हातात पावतीपुस्तक होतेमी पावती फाडावी अशी त्याची अपेक्षा होतीते असोमी प्रसाद नाकारलाम्हणजे समजा मी पाप केलेतर देवाने मला एकट्याला काय ती शिक्षा करावी नातुम्ही सर्वांनी भक्तिभावाने देवदर्शन घेऊनप्रसाद ग्रहण करून,देवस्थानाला देणग्या देऊन पुण्यकृत्ये केली नामग बस बंद का पडली तुमच्या सगळ्यांच्या पुण्याच्या प्रभावापेक्षा माझ्या एकट्याच्या पापाचा प्रभाव मोठा कसा ?"
सुक्याबरोबर ओलेही जळते." एका बाईने म्हणीचा उल्लेख केला. "
ही म्हण दैवी कृत्यांसाठी लागू नाहीभक्त प्रह्लादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकलेतरी ती उष्णता त्याला भाजू शकली नाहीदेव सर्वसमर्थ आहेतो मला एकट्याला सहज शिक्षा करू शकला असताज्या तोंडाने मी प्रसाद नाकारला ती वाचा बंद पडावीजे हात मी देवापुढे जोडले नाहीत ते लुळे पडावेजी वाकवून मी नतमस्तक झालो नाही ती मान लट-लट कंप पावावीअसे काही करणे त्याला शक्य नव्हते काय मग माझ्या पापासाठी बस बंद पाडून तुम्हा सर्व पुण्यवंतांचा खोळंबा कशाला केला ?"
अहोअसं काय बोलता तुम्ही हे तुमचे हातपाय खरेच लुळे पडले तर कोण बघणार तुमच्याकडेअसे बोलू नयेशुभ बोलावे." एक बाई भीतीयुक्त आश्चर्याने म्हणाल्या.
चिंता नसावीबोललो ते खरे आहेबोलून काही होत नाहीमाणसे उगीच देवाला घाबरताततो काही कुणाचे बरे -वाईट करू शकत नाही." मी उत्तरलो.
आढीतील एक आंबा नासला की बाकी सगळे आंबे नासतात." मधाच्या म्हणवाल्या बाई पुन्हा म्हणाल्याबहुदा त्या कुठल्यातरी प्रशालेत मराठीच्या शिक्षिका असाव्या.
आपणा तेवीस जणांत मी एकटाच नास्तिक म्हणून नासका आंबा हे मान्यपण नासक्या आंब्यातील जंतूंचा संसर्ग आढीतील इतर आंब्यांना होतो (साथीच्या रोगासारखाम्हणून ते नासतातमाझ्या नास्तिक विचारांचा परिणाम तुम्हा बावीस आस्तिकांतील एकावर तरी झाला आहे का कुणाची देवावरील श्रद्धा किंचित् तरी ढळली आहे का नास्तिक विचारांविषयी कुणाशीही बोललो नाहीतसा बोलतो आहे तो हा आत्ताबस बंद पडल्यावरत्यामुळे आढीतील नासक्या आंब्याची म्हण इथे अप्रस्तुत आहे."
"पण तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते हे खरे." कुणीतरी हळू आवाजात बोललेपण सार्‍यांना ऐकू आले असावे.
"तसे म्हणा हवे तरपण सीट रिकामी असल्याने कर्णिकांनी मला बोलावलेमी त्वरित पैसे भरलेत्यांनी सांगितलेल्या सीटवर बसलो.कुठे कसली तक्रार नाही.गैरवर्तन तर नाहीच नाहीसहलीचे वेळापत्रक पाळलेसर्वांबरोबर मंदिरांत आलोतिथे जे पटले नाहीकरावेसे वाटले नाही ते केले नाही हे खरेपण कधीही इतरांचा खोळंबा केला नाही."
पण आता इतका वेळ झाला ना?" कुणीतरी बोलले.
ठीक आहेमाझ्यामुळे हा खोळंबा झाला म्हणातुम्हांला बरे वाटावे म्हणून सगळा दोष माझ्यावर घेतोपण --स्वत:च्या गाडीतून देवदर्शनाला आलेल्या भाविकांचा मोटर अपघातात दुर्दैवी मृत्यू.--अशा बातम्या अनेकदां छापून येतातत्या अपघातग्रस्त गाड्यांतील सर्वजण १००श्रद्धाळू भाविक असताततरी असे जीवघेणे अपघात का घडतात देव आपल्या भक्तांना अपघातातून वाचवू शकत नाही कायविचार करावाबस बंद पडली त्याच्याशी बसमध्ये कोण कोण प्रवासी आहेतत्यांची विचारसरणी काय आहेत्यांची वागणूक कशी आहे इ.गोष्टींचा काहीही संबंध असूच शकत नाहीगाडीच्या कांही भागांतील दोषदेखभालीतील चाल-ढकलचूक,दक्षतेचा अभावरस्त्यातील खड्डेइंधनातील भेसळअसले कसले तरी कारण असू शकतेकार्य-कारणभाव समजून घ्यायला हवा. "

थोडावेळ शांतता पसरलीइंजिनाचा आवाज आल्यासारखे वाटलेसर्वांनी कान टवकारलेकांही क्षणांत बस चालू झालीबंद पडलेली गाडी दीड तासाच्या खटपटीनंतर मार्गी लागलीवेग घेतलापुढचा प्रवास चालू झालाप्रवाशांची मरगळ गेलीबसमध्ये उत्साहाचे वातावरण पसरलेसगळे जण मागचे सारे विसरलेहास्यविनोद झडू लागलेमी डोळे मिटून विचारमग्न झालोवाटले या प्रसंगाच्या निमित्ताने मी जे कांही बोललो त्यावर कोणीतरीकाहीतरीथोडातरी विचार करील काकुठेतरी ठिणगी पडेल का कुणाचे विचारचक्र चालू होईल कामला वाटले होकाहीतरी सकारात्मक घडेलमाणसाने आशावादी असावे.
-प्रा.य.ना.वालावलकर