संत, समाजसुधारक, वैज्ञानिक

🌸🍃🍂🌾🌸🍃🍂🌾🌸

*🙏🏻...तुकोबारायांचे परखड सवाल...🙏🏻*

*टिळा टोपी घालुनी माळा ।*
*म्हणती आम्ही साधू ।*
*दयाधर्म चित्ती नाही ।*
*ते जाणावे भोंदू ।*
*कलियुगी घरोघरी ।*
*संत झाले फार ।*
*वितीभरी पोटासाठी ।*
*हिंडती दारोदार ।।*

                                    - *संत तुकाराम*

अर्थ :
-  ढोंगी लोक भगवी कफनी वगैरेसारख्या अनेक बाह्य उपाधी धारण करून आपण साधू असल्याचे लोकांना भासवत असतात.या बाबतीत तुकाराम महाराज बोलतात ; हे लोक टिळे लावतात ,गळ्यात माळा घालतात.आनि स्वतःला साधू म्हणवून घेतात.ज्याच्याजवळ धर्म,दया, क्षमा,शांती नसते ..ते सगळे भोंदू असतात.कलियुगात असे केवळ पोंटासाठी दारोदारी फिरणारे भोंदू फार झाले आहेत.

*( संदर्भग्रंथ - विद्रोही तुकाराम, लेखक - डॉ. आ. ह. साळुंखे, प्रकरण - चौथेे, पृ.क्र. - १०९)*

🌸🍃🍂🌾🌸🍃🍂




🌸🍃🍂🌾🌸🍃🍂🌾🌸

*🙏🏻...तुकोबारायांचे परखड सवाल...🙏🏻*

*" काळतोंडा सुना ।*
*भलते चोरूनि करी जना ।।*
*धिग त्याचे साधुपण ।*
*विटाळूनि वर्ते मन ।।*
*मंत्र ऐसें घोकी ।*
*वश व्हावे जेणे लोकी ।।*
*मंत्र यंत्र काही करिसी जडी बुटी ।*
*तेणे भूतसृष्टी पावशील ।।*
*न लगे देशकाळ ।*
*मंत्रविधाने सकळ ।*
*मनोची निश्चळ ।*
*करुनि करुणा भाकावी ।।*

                                    - *संत तुकाराम*

अर्थ :
-  लोकांना कळू न देता भलते- सलते प्रयोग करणारा मांत्रिक हा काळतोंडया कुत्र्यासारखा असतो.त्याच्या साधुपणाचा धिक्कार असो.त्याचे मन वितळलेले असते.लोकांनि वश व्हावे , अशा पद्धतीने तो मंत्र घोकतो. मंत्र यंत्र जडीबुटी असे काही करशील तर भुुतसृष्टी पावशील.ईश्वराच्या प्राप्तीसाठी विविध प्रकारच्या मंत्रविधानाची गरज नसते.मनाने निश्चय करून त्याची करुणा भाकावी ,म्हणजे झाले.ईश्वर मंत्र व पूजा यांच्याविषयी उदास असतो..

*( संदर्भग्रंथ - विद्रोही तुकाराम, लेखक - डॉ. आ. ह. साळुंखे, प्रकरण - चौथेे, पृ.क्र. - १०९)*

🌸🍃🍂🌾🌸🍃🍂






🌸🍃🍂🌾🌸🍃🍂🌾🌸

*🙏🏻...तुकोबारायांचे परखड सवाल...🙏🏻*

*" झाकूनिया नेत्र काय जपतोसी ।*
*जो नाही मानसी प्रेमभाव ।।*
*हुंदकी पिसवी हलवी दाढी ।*
*मनी वोढी निंदेचे ।।*
*धर्म तो न कळे ।*
*काय झाकतील डोळे।।*
                                    - *संत तुकाराम*

अर्थ :
- मनात प्रेमभाव नसताना डोळे झाकून उगाचच कसला जप करत आहे. असा प्रश्न त्यांनी ढोंगी माणसाला विचारला आहे.त्याने डोळे झाकून जप करण्याचे नाटक केले , तरी त्याला खरा धर्म कळलेला नसतो .असा त्यांचा आक्षेप आहे.पिशवीत माळ ठेऊन पिशवीला हिसके देत देत आणि दाढी हलवत जप करण्याचे नाटक करणारा मनुष्य मणी ओढून जप करीत असल्याचे दिसत असले ,तरी तो मनातून मात्र प्रत्येक मन्याबरोबर कुणाची तरी निंदा करीत असल्यामुळे निंदेचे मणी ओढतो. असेच म्हणावे लागते....

*( संदर्भग्रंथ - विद्रोही तुकाराम, लेखक - डॉ. आ. ह. साळुंखे, प्रकरण - चौथेे, पृ.क्र. - १०९)*

🌸🍃🍂🌾🌸🍃🍂





🌸🍃🍂🌾🌸🍃🍂🌾🌸

*🙏🏻...तुकोबारायांचे परखड सवाल...🙏🏻*

*" नको सांडू अन्न नको सेवू वन ।*
*चिंती नारायण सर्व भॊगी ।।*
*सुखे खावे अन्न*
*त्याचे करावे चिंतन ।।*
*केला न सहावे तीर्थउपवास ।*
*घेऊनि धरणे बैसती उपवासी ।*
*हट आम्हांपासी नाही तैसा ।।*
                                    - *संत तुकाराम*

अर्थ :
- तुकारामांनी विविध युक्तिवाद करून उपवासाची आवश्यकता नसल्याचे दाखवून दिले आहे.ते म्हणतात : तू अन्न सोडू नकोस वा वनाचे सेवन करू नकोस सर्व प्रकारचे भोग घेत असताना नारायणाचे चिंतन कर .सुखाने अन्न खावे आणि त्याचे चिंतन करावे.त्याचे अन्न त्यालाच दिल्यासारखे होईल.आणि फळ आपल्याला मिळेल..काही लोक धरणे धरून उपवासी बसतात .तशा प्रकारचा हट्ट आमच्याजवळ नाही .त्यांनी विटंबना केली असेच म्हटले पाहिजे....

*( संदर्भग्रंथ - विद्रोही तुकाराम, लेखक - डॉ. आ. ह. साळुंखे, प्रकरण - चौथे, पृ.क्र. - १०८)*

🌸🍃🍂🌾🌸🍃🍂




*विचार तर कराल*🤓🤔

जे का रंजले गांजले
त्यांसि म्हणे जो आपुले!!
तो ची साधु ओळखावा
देव तेथीची जाणावा!!

*संत तुकाराम*
मग
*उघडा डोळे,  बघा निट* 🙄🤓



मंदिर क्षेत्रे दुकाने झाली, पूजा कमाई करू लागली ।
दक्षणा पात्रे पुढे आली पोटासाठी, कसली पूजा धुप दीप हि ॥
स्त्रिया बापड्या मंदिरी जाती, अंधानुकरणे ऐकती पोथी।
पदोपदी भांडणे होती, भोळ्या भक्तांची फजिती।

पदोपदी भांडणे होती, भोळ्या भक्तांची फजिती।
धनासाठी ओढाताण करती पंडे पुजारी॥
पुजारी असतील बेढंगे, सांगोनिया सरळ न वागे।
मंदिराचा भव्य वाडा, झाला गुंडांचा आखाडा।

ऐश्या स्थितीला बसाया आळा, सर्व लोकांनी करावा निर्वाळा ॥
मंदिराचा निधी सगळा । समाज कार्या करिता लावावा
नवे मंदिर न बांधावे । जुने ते स्वच्छ करावे।
उघडावी त्यात वाचनालये, औषधालये, योग विद्यालये ॥


*विचार संदेश- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज(ग्रामगीता)*

No comments:

Post a Comment