या ब्लॉगवरील लेख माझे नाहीत. दुसऱ्या लेखकांचे आहेत. पण सर्वांनी ते वाचावेत असे वाटल्याने हा ब्लॉग सुरु केलाय. लेख वाचून आपल्या मित्रांनाही वाचायला सांगा.
Monday, February 24, 2014
संत गाडगे महाराज - बुद्धीप्रामाण्यवाद - अंधश्रद्धा निर्मुलन
महाराष्ट्रातील अलीकडच्या काळातील संतांमधील शेवटची कडी म्हणजे संत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज. तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता नावाचा अतिशय सुंदर ग्रंथ लिहिला या माध्यमातून अतिशय सुंदर व्यावहारिक ज्ञान त्यांनी लोकांपर्यंत पोहचविले. तुकडोजी महाराजांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती व व्यसनमुक्ती केली हे आपण प्रामुख्याने वाचत व ऐकत आलो आहोत.
Wednesday, February 5, 2014

Monday, December 30, 2013
वास्तुशास्त्राचा पंचनामा
वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय हेच नेमके लोकांना माहित नसल्याने हे काहीतरी फार प्राचीन आणि फार मौल्यवान शास्त्र आहे असा समज वाढला आहे. आपल्या संस्कृतीतून मिळालेली हि एक मौल्यवान देणगी आहे, ह्या भाबड्या समजुतीमुळे या शास्त्राचा महिमा वाढला आहे. वास्तुशास्त्रद्यांनी सामान्यजनांच्या या भाबडेपणाचा फायदा घेतला आहे.

एका वास्तुशास्त्र ज्योतिषाला कुणीतरी विचारले --
"पेशावाईची भरभराट का झाली?"
"शनिवार वाड्याचे तोंड उत्तरेकडे होते म्हणून!"
"मग पेशवाई का बुडाली?"
"वाड्यात जाताना तोंड दक्षिणेला होत होते म्हणून!"
वास्तुशास्त्रातले शास्त्र काय आहे हे स्पष्ट करणारा हा संवाद आहे. गेल्या ३०-४० वर्षात वास्तुशास्त्राचे थोतांड इतके माजले आहे की अनेकजण त्याचा गंभीरपणे विचार करायला लागले आहेत. भरमसाठ पैसे आकारून, लोकांच्या भावनांशी खेळून, घरामध्ये वाट्टेल तसे बदल करायला लावून या सर्व भंपकपाणाला शास्त्राचा आणि विज्ञानाचा मुखवटा चढवण्यात हे लोक यशस्वी झाले आहेत.
वास्तूमध्ये जे बदल करणे शक्य नसते असे बदल करायला सांगणे, घराची मूळ मांडणीच वास्तुशास्त्राला धरून नसल्याने त्या घरात विविध समस्या निर्माण होत आहेत अशी भीती घालणे अशा उपायांनी हे वास्तुशात्राचे प्रणेते आपल्या धंद्याचा प्रसार आणि प्रचार करीत आहेत. त्यामुळेच ठेच जरी लागली तरी त्याला वास्तुच कारणीभूत असल्याचा कांगावा केला जात आहे.
साधारणपणे १९७० च्या आसपास मुंबई-पुण्यातील जुन्या चाळी आणि वाडे पाडून त्याठिकाणी ओनरशिप फ्लॅट बांधण्याच्या कामास वेग आला. गरजू लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे हा व्यवसाय फ़ोफ़वला. त्याकाळी घरबांधणीसाठी सुलभपणे कर्ज मिळत नव्हते आणि आजच्यासारखी गृहबांधणी व्यवसायाला भरभराट आलेली नव्हती. त्यामुळे बिल्डर लोकांनी मोठ्या प्रमाणावर बांधलेल्या सदनिकांच्या विक्रीसाठी प्रभावी विक्रीकौशल्याची आवश्यकता होती. त्यादृष्टीने वास्तुशात्राची नवी आयडिया काही लोकांच्या डोक्यातून बाहेर पडली आणि "वास्तुशास्त्रानुसार सदनिका" अशा जाहिरातींचे पेव फ़ुटले.
वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय हेच नेमके लोकांना माहित नसल्याने हे काहीतरी फार प्राचीन आणि फार मौल्यवान शास्त्र आहे असा समज वाढला. आपल्या संस्कृतीतून मिळालेली हि एक मौल्यवान देणगी आहे आणि त्यामुळे आपल्या निवासस्थानाचा उपयोग आपल्या आयुष्याच्या कल्याणासाठी होऊ शकतो ह्या भाबड्या समजुतीला ह्या शास्त्राने पाणी घातले. बिल्डर लोकांनी सामान्यजनांच्या ह्या भाबडेपणाच्या पुरेपूर फायदा घेतला आणि वास्तुशास्त्रज्ञांची एक नवी पलटण या क्षेत्रात उतरली.
याच चाणाक्ष लोकांनी बांधलेल्या घरातील "दोष" शोधायला सुरुवात केली. पद्धतशीरपणे सापळा रचून प्राचीन शास्त्र, पुराणे, पुरातन मंदिरे, रामायण-महाभारतासारख्या धार्मिक ग्रंथातले दाखले देऊन भोळ्या लीकांच्या श्रद्धेच्या आधारे आपल्या व्यवसायाचा पाया भक्कम केला. अध्यात्म, मानसशास्त्र, पुराणातील भाकडकथा, जोतिषशास्त्र अशा सर्व साधनांची आपल्या मनाप्रमाणे मोडतोड करून आधुनिक वास्तुशास्त्र निर्माण करण्यात आले. शास्त्र म्हटले की नियम आले. कार्यकारण संबंध आला. माती, पाणी, उजेड, वारा, गुरुत्वाकर्षण, चुंबकीय तत्व या सर्व नैसर्गिक तत्वांचा अभ्यास करून त्यांचा योग्य तो मिलाफ करून वास्तूची रचना करणे म्हणजे वास्तुशास्त्र. भूकंपप्रवण क्षेत्र, समुद्रकिनारे, डोंगराळ भाग, उष्ण-शीत कटिबंध, वाऱ्याची दिशा, पावसाचे प्रदेश अशा गोष्टींचा विचार वास्तू बांधताना करणे अपेक्षित आहे. त्यामुळे स्थळ, काळ, हवामान परिस्थिती, उपलब्ध साधनसामग्री यांचा विचार ह्या शस्त्राने केला पाहीजे. परंतु आधुनिक वास्तुज्योतिषी सांगतात त्याप्रमाणे एकच एक नियम सर्वत्र लागू पडत नाही. बऱ्याच वेळेला घर बांधणारा मालक इंजिनिअरचा सल्ला बाजूला ठेवून वास्तुशास्त्रज्ञाच्या मताला प्राधान्य देतो. स्थापत्य अभियांत्रिकीच्या अभ्यासापेक्षा या पारंपारिक ज्योतिषांच्या अभ्यासाला प्राधान्य दिले जाते.
काही जुन्या भारतीय ग्रंथात वास्तुनिर्मितीचे उल्लेख आहेत. पण ते फक्त महाल, राजवाडे, प्रासाद, मंदिरे, उद्याने यांच्याच संदर्भात आहेत. वास्तुज्योतीषी अशा गोष्टींचे आपल्या पुस्तकात मोठे भांडवल करतात. परंतु त्या शास्त्राप्रमाणे बांधलेल्या वास्तू आज अस्तित्वात नाहीत. ह्या माहितीत वस्तुस्थितीपेक्षा कल्पनाविलासच जास्त आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक वास्तुशिल्पे, मंदिरे आज दिसतात. परंतु त्यांचा इतिहास गेल्या हजार-बाराशे वर्षा इतकांच आहे. अनेक भग्न मंदिरे ज्योतिषशास्त्राप्रमाणे आहेत असेही नाही. विश्वकर्मा हा "आद्यवास्तुविशारद" मानला जातो. परंतु त्याला पुराणाशिवाय कोणताही आधार नाही. इजिप्तच्या "इम होतेप" याने आश्चर्यकारक वास्तुनिर्मिती केली. पाच हजार वर्षापूर्वीच्या या वास्तू आजही पहावयास मिळतात. मोहेंजोदाडो-हडप्पा येथील नगररचनाही तितक्याच जुन्या आहेत. त्यातील वास्तुशास्त्रही थक्क करणारे आहे. परंतु या वास्तुशास्त्राचा कोणताही मागोवा न घेता आज जे वास्तुज्योतिषी या शास्त्राच्या प्राचीन परंपरेचा उल्लेख करत आहेत तो केवळ आपमतलबी आणि स्वार्थप्रेरक आहे असेच म्हणावे लागेल.
धरणीमाता अन्न, वस्त्र, निवारा देते. ती कुणातही भेदभाव करत नाही. ती पवित्र असली तरी वास्तुनिर्मिती करताना कृमि, किटक, जंतू आणि प्राणी यांची अकारण हत्या होते. काही प्राणी निराधार होतात. कुदळीचे घाव घालून आपण त्या मातेला उपद्रव देतो. त्या कृतीचे पापक्षालन म्हणून आपण त्या स्थानी भूमिपूजन करतो. वास्तुशांती करतो. आग्नेयाला अग्नी प्रज्वलित करणे इत्यादी धार्मिक कार्ये श्रध्दापूर्वक करतो आणि नंतर त्या वास्तूत आनंदाने राहावयास जातो. हीच आपली खरी प्राचीन परंपरा. परंतु वास्तुशास्त्र नावाचे आधुनिक शास्त्र "शोधून" त्याच्या आधारे नवीन वास्तू बांधली नाही तर आपले वाटोळे होईल असा किडा एकदा डोक्यात वळवळू लागला की शास्त्र संपते आणि भ्रम सुरु होतो.
वास्तुज्योतिषशास्त्राची भरभराट होण्याचे एक मोठे कारण म्हणजे या क्षेत्रात प्रचंड पैसा दडलेला आहे. फलज्योतिषी, हस्तसामुद्रिकया क्षेत्रात घुसले. मंगळ वक्री आहे म्हणून समस्या निर्माण होत आहेत असे म्हणण्याऐवजी घराचा संडास ईशान्येला आहे म्हणून समस्या निर्माण आहेत असे म्हटले जावू लागले. वृत्तपत्र आणि टीव्हीवर जाहिरात करून, मेळावे घेऊन लोकांना ह्या शास्त्राच्या जाळ्यात ओढले जावू लागले. फलज्योतिषाला विचारले जाणारे प्रश्नच वास्तुज्योतीषाला विचारले जावू लागले आणि या वास्तुज्योतिषांना घबाडयोग साधला.
सामान्यपणे मनुष्याला भेडसावणाऱ्या समस्या म्हणजे मुलाला नोकरी नाही, मुलामुलींची लग्ने जुळत नाहीत, नवरा-बायकोचे पटत नाही, सासू-सुनेचे पटत नाही, आजारपण सुटत नाही इत्यादी. कर्ज, विवंचना, व्यसनाधिनता, धंद्यामध्ये नुकसान आणि आयुष्यातले अपयश, मिळकत आणि खर्चात तफावत, यश मिळत नाही, इस्टेटीसाठी भाऊबंधकी अशा असंख्य कारणांमुळे माणसे बेजार असतात. कोणी करणी केली आहे, कुणाची नजर लागली आहे अशा सतत संशयाने ते पछाड्लेले असतात. एका मानसिक भीतीच्या दडपणाखाली ते वावरत असतात. अशा वेळी घराची मांडणी वास्तुशास्त्राला धरुन नसल्यानेच या समस्या निर्माण झाल्याचे त्यांना सांगितले तर त्यांचा त्यावर सहज विश्वास बसतो. या मानसिकतेचा कौशल्याने उपयोग करुन त्यावर भरभक्कम मोबदला घेतला जातो. शयनगृहाची जागा बदला, बैठकीचे ठिकाण बदला, पाण्याची टाकी दुसरीकडे हलवा अशा असंख्य सुचना केल्या जातात. एकदा या शास्त्राचा मनावर पगडा बसला की येणारे कोणतेही संकट वास्तूदोषामुळे येते असा समज बळावतो. त्यातूनच लोक आपले मानसिक संतुलन घालवून बसतात. एखाद्या अधिक कमकुवत मनाच्या व्यक्तीचे आयुष्यही त्यामुळे बरबाद होवून जाते.
वास्तुशास्त्र उर्फ वास्तुज्योतीषाचे आज पूर्णपणे व्यापारीकरण झाले आहे. हे शास्त्र आता लोकांच्या पैशावर चांगलेच भरभराटीला आले आहे. पैसा दिला तर दोष लगेच नाहीसा होतो. जाहिरात करून मूर्ख व अज्ञानी लोकांना कसे फसवावे हे शास्त्र चांगले विकसित झाले आहे. मी अमक्या वास्तुज्योतीषाचे मार्गदर्शन घेतल्यामुळे माझा तमका फायदा झाला असे सांगणारे अनेकजण ह्या जाहिरातबाजीच्या विळख्यात अडकले आहेत. याचा आधार अमक्या पुराणात आहे असे नुसते सांगावयाचा अवकाश, श्रद्धावान भाविकांची डोळे झाकून, बुद्धी गहाण टाकून तिकडे मेंढरासारखी धावाधाव सुरु होते.
काही ठिकाणी तोडफोड करणे शक्य नसते त्यामुळे लोक तोडफोड करुन मोठ्या खर्चात पडायला तयार होत नाहीत. यांवरही वास्तुज्योतीष्यांकडे फर्मास उपाय आहेत. वास्तुदोष घालवण्यासाठी मंत्रांनी सिद्द्ध केलेली यंत्रे, रत्ने, माळा, फोटो, पादुका, घंटा, बासऱ्या, नाग, करंडे, झाडांची मुळी, त्रिशूळ असे असंख्य उपाय हजर असतात. हे किमती तोडगे खास तुमच्यासाठी नाममात्र किमतीला देऊ करणारे काही महापरोपकारी वास्तुज्योतिषीही आहेत. ऑपरेशन न करता केवळ मंत्र म्हणून अपेंडिक्स बरा होऊ शकतो. पण श्रद्धा नसेल तर मात्र का गुण येणार नाही असे म्हणणाऱ्या मांत्रिकासारखाच हा प्रकार असतो.
वास्तुशास्त्राचा गाभा म्हणजे अष्टदिशा आणि त्यांचे स्वामी! पुराणकर्त्यांनी एक एक दिशेला एक एक स्वामी नेमला आहे. ह्या स्वामींच्या आवडी-निवडी व स्वभाव त्यांनीच ठरवले आहेत. मनासारखे घडले तर ते प्रसन्न होतात. प्रमाद घडला तर उपद्रव करतात. दिशा हि संकल्पनाच वास्तुशास्त्राने शास्त्रीयदृष्ट्या स्पष्ट केलेली नाही. विज्ञानाच्या कसोटीवर ती टिकू शकत नाही. पृथ्वी स्थिर आहे अशा गृहीतावरच हे आधारित आहे. सुर्य, चंद्र, गृह, तारे, ब्रह्मांड यांची गती व पृथ्वीची स्वतःची गती ही संकल्पनाच विचारात घेतली जात नाही. दिशा ही सापेक्ष आहे. ती कुठल्याच गोष्टीचे कारण असू शकत नाही आणि त्यामुळे ह्या दिश्यांच्यावर आधारलेले शास्त्र वैज्ञानीक निकषावर टिकू शकत नाही. ऊर्ध्व आणि अधो ह्या दोन दिशाही वास्तुज्योतीषी विचारात घेत नाहीत. त्यामुळेच दिशा हि संकल्पनाच ह्या क्षेत्राला पेलवलेली नाही हे स्पष्ट होते.
वास्तुपुरुष हि प्राचीन संकल्पनाही अशीच विवादास्पद आहे. पुराणात ह्या संबंधीच्या ज्या कथा आहेत त्यानुसार वास्तुपुरुष म्हणजे -
१. शंकराच्या घामापासून निर्माण झालेले भूत
२. वास्तोष्पति नामक प्राचीन वैदिक देवता
३. छगासुर नावाचा राक्षस
४. पृथ्वी आणि आकाश यांना रोखणारे महाभूत
या सर्वांना वास्तुपुरुष असे म्हटले जाते. या वास्तुपुरुषाला ब्रम्हदेवाने असे वरदान दिले की पृथ्वीवरील लोक वास्तु निर्माण केल्यानंतर तुझी पूजा करतील व तुला बलीभाग अर्पण करतील. त्यांनी असे न केल्यास त्या घरातील व्यक्ती, धनधान्य आणि समाधान या सर्वांना तू खाऊन टाक. कोणत्या धर्मात असा लोकांना खाऊन टाकणारा देव असेल? वास्तुशात्र हे मुख्यतः पुराणे व पुराणांचेच सहोदर असणारे "समरांगण सूत्रधार" आणि "मनसार" या ग्रंथांवर आधारित आहे. अशी पुराणे कोणत्याही शास्त्राचे प्रमाण म्हणून स्वीकारता येत नाहीत. त्यांच्यातील विसंगती, भिन्न विचार आणि विज्ञानाच्या पायावर न टिकणारी गृहिते, कर्मकांडांचा अतिरेक यामुळे शास्त्रापेक्षा धर्माला विकृत स्वरूप देण्याचेच कार्य त्यांनी केले आहे. विचारवंतांनी आधुनिक काळामध्ये स्वीकारलेला बुद्धिप्रामाण्यवाद आणि तर्कशक्ती यांच्या आधारावरच या वास्तुशास्त्राचा विचार करावा लागतो व याठिकाणी ते शास्त्र मानवी संशयाचे निराकरण करण्यास पूर्णपणे अपुरे ठरते.
वास्तुशास्त्राचा एवढा प्रचंड हलकल्लोळ माजल्यानंतर आणि या क्षेत्रात अनेक नवनवे अभ्यासू तज्ञ उतरल्यानंतरही या क्षेत्राचे अनभिज्ञपण कमी होत नाही. तरीही मानवी स्वभावाला अगम्य गोष्टींचे असणारे आकर्षण आणि अज्ञाताची ओढ यामुळे या वास्तुशास्त्राच्या अभ्यासाची गोडी अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र आहे. श्रद्धावान माणसांनी त्याचे परिशीलन करण्यास हरकत नाही. परंतु वास्तुशास्त्राच्या एका अभ्यासकाने आपल्या पुस्तकात दिलेला हा इशारा मात्र लक्षात ठेवावा असा आहे --
या पुस्तकातील उपाय, तोडगे करुन पहावेत. फरक न पडल्यास लेखक जबाबदार राहणार नाहीत. पडणाऱ्या अगर न पडणाऱ्या फरकाचा दावा लेखक उचलत नाही.या वक्तव्याला कोणत्या भाष्याची गरज आहे काय?
(लेखक: सदानंद उकिडवे)
Saturday, December 21, 2013
पार्टी
आई, तू म्हणाली होतीस,..... पार्टीला जायचंय, तर जा...... पण ‘पिऊ’ नकोस.. .... आई, खरं सांगतो. ......मी नाही प्यायलो.... मी फक्त सॉफ्टड्रिंक प्यायलो. सोडा असलेलं.....! आई, खूप आग्रह केला मित्रांनी..... म्हणाले पी रे. पी रे..... पण नाही प्यायलो मी..... सगळ्यांनी चिडवलं मला, भरीस पाडलं...... पण मी नाहीच ग्लासला हात लावला...... तुला दिलेलं प्रॉमिस पाळलं. ......न पिण्याचं.!..... आई, कोणी काहीही म्हणो... न पिता एन्जॉय करता येत...ं हे तुझं वाक्य माझ्या लक्षात होतं...... मला गरजच नाही वाटली नशेची.!... आई, पार्टी संपत आली आहे आत्ता.... जो तो घराकडे निघालाय.... खूप पिऊन ‘टाईट’ झालेले :....माझे मित स्वत ड्राईव्ह करत घराकडे निघालेत..... मीही माझ्या कारजवळ पोहोचलोय..... निघालोय. पूर्ण शुद्धीत..! मी येईन घरी धडधाकट..... नशेत गाडी ठोकण्याचा,... काहीबाही होण्याचा प्रश्नच नाही मी प्यालोच नाही..... तर बेभान होण्याचं काही कारणही नाही.... आई, मी निघालो.... गाडी काढतच होतो बाहेर.... पण पाहतो तर काय.... समोरून एक गाडी सुसाट येताना दिसतेय...... माझ्या जवळ अगदी जवळ येतेय ती..... माझ्या गाडीवर..आदळतेय.. आई, मी पडलोय गाडीबाहोर... काहीच कळत नाहीये... अंगातून काहीतरी ...कारंजं फुटल्यासारखं उडतंय. कोणीतरी ...हवालदार ओरडतोय जोरजोरात..... दारू पिऊन ...बुंगाट गाडी चालवत होती ती पोरं... त्यांच्या गाडीनं ठोकलं याला... मरणार हे पोरगं हकनाक... आई,. मला वेदना होताहेत गं खूप... तू जवळ असावीस असं वाटतंय.... मी. मी.? आई. मला का ठोकलं गं त्यांनी.... रक्ताच्या थारोळ्यात पडलोय मी.... जमलेत इथे सगळं जण... डॉक्टर, पोलीस, .. ते डॉक्टर म्हणताहेत.... .काही चान्सेस नाही,.. संपलंय सारं... काहीच उपाय नाही.. नाही वाचणार हा... .आई, तुझी शपथ... मी ‘प्यायलो’ नव्हतो गं.... त्या गाडीतली मुलं नशेत होती... खूप प्यायली होती.... दारू पिऊन गाडी चालवत होती.. आई, ती मुलंही माझ्याच बरोबर... त्या पार्टीत होती बहुतेक... फरक इतकाच.. की प्यायले ते आणि मरतोय मी.!... का पितात गं आई हे लोकं.....? सगळं आयुष्य नासवतात.. स्वत:चं. आणि दुसर्यांचंही. !... आई, मला आता असह्य वेदना होतायंत.... आतल्या आत काहीतरी चिरत,.. .कापत जातंय... आई,.. .ज्या मुलाने माझी ही अवस्था केली... तो शुद्धीत येतोय आता.... .मी कळवळतोय आणि तो फक्त पाहतोय.... सुन्नपणे. ! आई, माझ्यासारखंच त्यालाही ...कुणीतरी सांगायला हवं होतं.... दारू पिऊन गाडी चालवू नकोस. .......त्यानं ते ऐकलं असतं तर आज मी जिवंत राहिलो ....असतो गं. आई, मला आता श्वास लागायला... लागलाय. तुटायला मी अख्खा. ...आतल्या आत. पण... तू नाही रडायचंस ...... मला जेव्हा जेव्हा तुझी गरज होती..... तेव्हा तेव्हा होतीस तू बरोबर. माझ्यासाठी.!... पण मरताना मला ... एक शेवटचा प्रश्न पडलाय... जर मी दारू पिऊन. ... नव्हतो तर मग..... मी का मरायंचं?... दुसर्याच्या चुकीची शिक्षा..... मीच का भोगायची..? आई. का लोक दारू पिऊन ... चालवतात गं.?
Thursday, November 14, 2013
हृदयस्पर्शी कथा
कॉलेजमध्ये,कट्ट्यावर जिकडे पहावे तिकडे एकच नाव
होतं श्रुती आणि राम. असणारच ना कारण
त्या दोघांचं एकमेकांवर तेवढं
प्रेमही होतं.श्रुती दिसायला इतकी सुंदर
जणू
देवाच्या हातातील कलाकृतीचा एक
सुंदर
नमुना आणि राम म्हणजे दिसायला जेमतेम पण
क्षणार्धात मन जिंकून घेणारा त्यामुळे
त्यांची जोडी चांगलीच
जमली होती.
एके दिवशी दोघांनी मिळून
महाबळेश्वरला फिरायला जाण्याच
ठरवलं,ठरल्याप्रमाणे दोघही महाबळेश्वरला गेले
खूप-
खूप एन्जॉय केला आणि परत घराकडे
जाण्यासाठी बसस्थानकाकडे आले.
श्रुतीला तिथे
गरम-गरम भेटणारे खारे शेंगदाणे खूपच आवडत असत
म्हणून तिने रामकडे शेंगदाणे
आणण्यासाठी हट्ट
धरला मग रामनेही तिचा हट्ट पुरवला व
गाडी पुन्हा परतीचा प्रवास करू
लागली पण
श्रुती गाडीत
रामची जाणूनबुजून थट्टा करत
होती मग
अचानक ती म्हणाली "ए राम तू जर
शेंगदाणे
विकणारा असतास तर किती छान झालं असतं
रे,मी लगेच तुझ्याशी लग्न केलं
असतं "
रामही तिला हसून हसून प्रतिसाद देत
होता आणि हसता हसता प्रवास
कधी संपला दोघांनाही कळलच
नाही त्यानंतर बरेच
दिवस सुखात गेले,पण एक त्यादिवशी राम
जेव्हा कॉलेजला आला तेव्हा श्रुतीची एक
मैत्रीण
रामकडे एक चिट्ठी देऊन गेली,त्याने
ती चिट्ठी वाचली अन
त्याच्या काळजात चर्रर्र
झालं,डोक्यात मुंग्या आल्या ,त्याला अंगातून प्राण
गेल्यासारख वाटत होतं त्या चिट्ठीत
श्रुतीने लिहल
होतं कि 'सॉरी राम माझं लग्न ठरल
आहे,मी माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊ शकत
नाही कृपया माझा शोध घेऊ नकोस…
आणि खरच
तसच झाल होत
श्रुतीला तिच्या घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे
लग्न
कराव लागलं होत आणि त्यांचं कुटुंब दूर कुठे
तरी निघून गेल होत.इकडे रामही ते
शहर सोडून कुठे
तरी निघून गेला होता...कुठे ? कुणालाच माहित
नव्हत…???
इकडे पाच वर्षात श्रुतीचा संसार आता चांगलाच
फुलला होता. त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस
महाबळेश्वरला साजरा करण्याचा तिच्या पतीने
ठरवलं
होतं,ठरल्याप्रमाणे सगळे महाबळेश्वरला गेले खूप
थाटामाटात वाढदिवस साजरा झाला अन मग सगळे
पुन्हा परत जाण्यासाठी निघाले पण तेवढ्यात
श्रुतीला तिचे आवडतीचे ते गरम
गरम खारे शेंगादाणे
खाण्याची इच्छा झाली म्हणून
गाडी बसस्थानकाकडे
नेण्यात आली.
गाडीमधून उतरून ती कुठे शेंगादाणे
विकणारा दिसतोय
का ते बघू लागली दूर एका कोपऱ्यात सायकलवर
आगेच ते धगधगत मडक घेऊन अतिशय कृश
झालेला दाढी वाढलेला एक माणूस शेंगदाणे
विकताना तिला दिसला ती धावत पळत त्याच्याकडे
गेली आणि त्याला दहा रुपयाची नोट
दिली आणि शेंगादाणे घेण्यासाठी हात
पुढे केला तर
अश्रूचा एक थेंब तिच्या तळहातावर पडला तिने वर
बघितलं तर तो शेंगदाणे
विकणारा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून
राम
होता तो …तिचा प्रियकर राम…तिला धक्काच
बसला होता, ती त्याला म्हणाली 'हे
अस कस
झालं ??' अश्रूचा एक अवंढा गिळत त्याने उत्तर
दिलं, की "श्रुती तूच
एकदा म्हंटली होतीस
ना की तू
शेंगदाणे विकणारा असतास तर
मी तुझ्याशी लगेच
लग्न केलं असत" सांग ना करणार
ना माझ्याशी लग्न….?? बघ
ना झालो ना मी आता शेंगादाणे
विकणारा आता तरी करणार
ना माझ्याशी लग्न…??तो अस म्हणताच
तिच्याही अश्रूंचा बांध तुटला पण स्वतःला सावरत
ती तशीच गाडीकडे
पळाली,गाडीत
बसली,अन
गाडी भरघाव निघून गेली.
अन तो तिथेच ती निघून गेलेल्या वाटेकडे
भरलेल्या डोळ्यांनी हातात शेंगादाणे घेऊन टक
लाऊन
बघत उभा होता.
होतं श्रुती आणि राम. असणारच ना कारण
त्या दोघांचं एकमेकांवर तेवढं
प्रेमही होतं.श्रुती दिसायला इतकी सुंदर
जणू
देवाच्या हातातील कलाकृतीचा एक
सुंदर
नमुना आणि राम म्हणजे दिसायला जेमतेम पण
क्षणार्धात मन जिंकून घेणारा त्यामुळे
त्यांची जोडी चांगलीच
जमली होती.
एके दिवशी दोघांनी मिळून
महाबळेश्वरला फिरायला जाण्याच
ठरवलं,ठरल्याप्रमाणे दोघही महाबळेश्वरला गेले
खूप-
खूप एन्जॉय केला आणि परत घराकडे
जाण्यासाठी बसस्थानकाकडे आले.
श्रुतीला तिथे
गरम-गरम भेटणारे खारे शेंगदाणे खूपच आवडत असत
म्हणून तिने रामकडे शेंगदाणे
आणण्यासाठी हट्ट
धरला मग रामनेही तिचा हट्ट पुरवला व
गाडी पुन्हा परतीचा प्रवास करू
लागली पण
श्रुती गाडीत
रामची जाणूनबुजून थट्टा करत
होती मग
अचानक ती म्हणाली "ए राम तू जर
शेंगदाणे
विकणारा असतास तर किती छान झालं असतं
रे,मी लगेच तुझ्याशी लग्न केलं
असतं "
रामही तिला हसून हसून प्रतिसाद देत
होता आणि हसता हसता प्रवास
कधी संपला दोघांनाही कळलच
नाही त्यानंतर बरेच
दिवस सुखात गेले,पण एक त्यादिवशी राम
जेव्हा कॉलेजला आला तेव्हा श्रुतीची एक
मैत्रीण
रामकडे एक चिट्ठी देऊन गेली,त्याने
ती चिट्ठी वाचली अन
त्याच्या काळजात चर्रर्र
झालं,डोक्यात मुंग्या आल्या ,त्याला अंगातून प्राण
गेल्यासारख वाटत होतं त्या चिट्ठीत
श्रुतीने लिहल
होतं कि 'सॉरी राम माझं लग्न ठरल
आहे,मी माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊ शकत
नाही कृपया माझा शोध घेऊ नकोस…
आणि खरच
तसच झाल होत
श्रुतीला तिच्या घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे
लग्न
कराव लागलं होत आणि त्यांचं कुटुंब दूर कुठे
तरी निघून गेल होत.इकडे रामही ते
शहर सोडून कुठे
तरी निघून गेला होता...कुठे ? कुणालाच माहित
नव्हत…???
इकडे पाच वर्षात श्रुतीचा संसार आता चांगलाच
फुलला होता. त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस
महाबळेश्वरला साजरा करण्याचा तिच्या पतीने
ठरवलं
होतं,ठरल्याप्रमाणे सगळे महाबळेश्वरला गेले खूप
थाटामाटात वाढदिवस साजरा झाला अन मग सगळे
पुन्हा परत जाण्यासाठी निघाले पण तेवढ्यात
श्रुतीला तिचे आवडतीचे ते गरम
गरम खारे शेंगादाणे
खाण्याची इच्छा झाली म्हणून
गाडी बसस्थानकाकडे
नेण्यात आली.
गाडीमधून उतरून ती कुठे शेंगादाणे
विकणारा दिसतोय
का ते बघू लागली दूर एका कोपऱ्यात सायकलवर
आगेच ते धगधगत मडक घेऊन अतिशय कृश
झालेला दाढी वाढलेला एक माणूस शेंगदाणे
विकताना तिला दिसला ती धावत पळत त्याच्याकडे
गेली आणि त्याला दहा रुपयाची नोट
दिली आणि शेंगादाणे घेण्यासाठी हात
पुढे केला तर
अश्रूचा एक थेंब तिच्या तळहातावर पडला तिने वर
बघितलं तर तो शेंगदाणे
विकणारा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून
राम
होता तो …तिचा प्रियकर राम…तिला धक्काच
बसला होता, ती त्याला म्हणाली 'हे
अस कस
झालं ??' अश्रूचा एक अवंढा गिळत त्याने उत्तर
दिलं, की "श्रुती तूच
एकदा म्हंटली होतीस
ना की तू
शेंगदाणे विकणारा असतास तर
मी तुझ्याशी लगेच
लग्न केलं असत" सांग ना करणार
ना माझ्याशी लग्न….?? बघ
ना झालो ना मी आता शेंगादाणे
विकणारा आता तरी करणार
ना माझ्याशी लग्न…??तो अस म्हणताच
तिच्याही अश्रूंचा बांध तुटला पण स्वतःला सावरत
ती तशीच गाडीकडे
पळाली,गाडीत
बसली,अन
गाडी भरघाव निघून गेली.
अन तो तिथेच ती निघून गेलेल्या वाटेकडे
भरलेल्या डोळ्यांनी हातात शेंगादाणे घेऊन टक
लाऊन
बघत उभा होता.
Saturday, November 9, 2013
सोने आणि लोखंड
एक सोनार होता.
त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे
दुकान होते.
सोनार जेव्हा काम करत असे
तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज
होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे
तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने
मोठा आवाज होत असे.
तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके
दिवशी सोनाराच्या दुकानातील एक
सोन्याचा कण कसा कोण जाणे पण
लोहाराच्या दुकानात जावून पडला.
त्या सोन्याच्या कणाची भेट
एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप
दिवसांची ओळख असल्यासारखे ते
एकमेकांशी बोलू लागले.
सोन्याच्या कणाने
लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले
दुःख तर खरे एकसमान आहे.
दोघानाही आगीत तापवले जाते
आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर
बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे
काय?"
लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून
दुःखी स्वरात म्हणाला," अरे तुझे म्हणणे
अगदी बरोबर आहे.
दोघानाही तापवणारी आग एकच आहे
आणि ठोकणारा हातोडाहि एकाच
धातूचा आहे.
पण खरे दुःख याचे आहे कि
तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच
लागत नाही पण
मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने
माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने
दिलेल्या दुःखापेक्षा "
स्वकीयांनी दिलेला त्रास
हा अगदी हृदयात वार करून जातो.....
त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे
दुकान होते.
सोनार जेव्हा काम करत असे
तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज
होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे
तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने
मोठा आवाज होत असे.
तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके
दिवशी सोनाराच्या दुकानातील एक
सोन्याचा कण कसा कोण जाणे पण
लोहाराच्या दुकानात जावून पडला.
त्या सोन्याच्या कणाची भेट
एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप
दिवसांची ओळख असल्यासारखे ते
एकमेकांशी बोलू लागले.
सोन्याच्या कणाने
लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले
दुःख तर खरे एकसमान आहे.
दोघानाही आगीत तापवले जाते
आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर
बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे
काय?"
लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून
दुःखी स्वरात म्हणाला," अरे तुझे म्हणणे
अगदी बरोबर आहे.
दोघानाही तापवणारी आग एकच आहे
आणि ठोकणारा हातोडाहि एकाच
धातूचा आहे.
पण खरे दुःख याचे आहे कि
तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच
लागत नाही पण
मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने
माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने
दिलेल्या दुःखापेक्षा "
स्वकीयांनी दिलेला त्रास
हा अगदी हृदयात वार करून जातो.....
Saturday, October 26, 2013
डोळे
एक मुलगी बस स्टँड ला बसुन रडत असते तिचं हे करुण रडणं ऐकून कामाला जायला निघालेला तरुण तिला विचारतो "तु का रडतेस ग"! त्यावर ती म्हणते "मला खुप भुक लागली आहे" म्हणुन त्याला तिची दया येते.
तो तिला खायला आणुन देऊन तो आपल्या मार्गी निघुन जातो..संध्याकाळी कामावरुनघरी येताना ती मुलगी त्याला तिथेच बसलेली दिसते. तिला जाऊन तो विचारतो,'काय ग तु अजुन ईथेच घरी का नाही गेली', त्यावर ती रडत रडत सागंते "माझं या जगात कोणी नाही आणि मी एक आंधळी मुलगी आहे." हे ऐकुन त्याचे ह्रदय गहीवरुन येते. तो तिला सांगतो कि "तुझी काही हरकत नसेल तर माझ्या सोबत चल",ती काही वेळ विचार करुन जायला तयार होतेँ.काही दिवसानी तो तिला तिच्या अंधत्वाचं कारण विचारतो आणि ती सांगते की "एका अपघातामधे मी माझेआईवडील गमावले मी वाचले पण आंधळी झाले" हे ऐकुन त्याला खुप वाईट वाटते कारण तो ही एक अनाथ असतो त्याचं तिच्यावर प्रेम जडते आणि एक दिवस तो तिला लग्नाची मागणी घालतो. काहि वेळासाठी ती स्तब्ध होते.. "मला हि आवडतोस पण.." बोलते "मला दृष्टी असती तर मी तुझ्याशी लग्न केलं असतं, मग तो बोलतो "ठिक आहे तुला दिसायला लागल्या वर मी कसाही असलो तरी लग्न करशील ना" ती म्हणते "हो मी वचन देते" काही महिन्याने तो तिचं आँपरेशन मोठ्या दवाखान्यात करुन घेतो.आणि ती पुर्णपणे बरी होऊन तिच्या प्रियकराला बघते तेव्हा तिला धक्का बसतो कारण तो एक आंधळा असतो एका रात्री ती त्याला लग्नाला स्पष्ट नकार देते. त्यावर तो खुप दुःखी होतो,आणि सकाळ होताच तिच्या अंथरुणा शेजारी एकचिठ्ठी ठेऊन दुर निघुन जातो.जेव्हा ती चिठ्ठी ती वाचते तर ती ढसाढसा रडते त्यात फक्त एवढच लिहलं होतं..." I LOVE U...PLEASE TAKE CARE OF MY EYES.."..
तो तिला खायला आणुन देऊन तो आपल्या मार्गी निघुन जातो..संध्याकाळी कामावरुनघरी येताना ती मुलगी त्याला तिथेच बसलेली दिसते. तिला जाऊन तो विचारतो,'काय ग तु अजुन ईथेच घरी का नाही गेली', त्यावर ती रडत रडत सागंते "माझं या जगात कोणी नाही आणि मी एक आंधळी मुलगी आहे." हे ऐकुन त्याचे ह्रदय गहीवरुन येते. तो तिला सांगतो कि "तुझी काही हरकत नसेल तर माझ्या सोबत चल",ती काही वेळ विचार करुन जायला तयार होतेँ.काही दिवसानी तो तिला तिच्या अंधत्वाचं कारण विचारतो आणि ती सांगते की "एका अपघातामधे मी माझेआईवडील गमावले मी वाचले पण आंधळी झाले" हे ऐकुन त्याला खुप वाईट वाटते कारण तो ही एक अनाथ असतो त्याचं तिच्यावर प्रेम जडते आणि एक दिवस तो तिला लग्नाची मागणी घालतो. काहि वेळासाठी ती स्तब्ध होते.. "मला हि आवडतोस पण.." बोलते "मला दृष्टी असती तर मी तुझ्याशी लग्न केलं असतं, मग तो बोलतो "ठिक आहे तुला दिसायला लागल्या वर मी कसाही असलो तरी लग्न करशील ना" ती म्हणते "हो मी वचन देते" काही महिन्याने तो तिचं आँपरेशन मोठ्या दवाखान्यात करुन घेतो.आणि ती पुर्णपणे बरी होऊन तिच्या प्रियकराला बघते तेव्हा तिला धक्का बसतो कारण तो एक आंधळा असतो एका रात्री ती त्याला लग्नाला स्पष्ट नकार देते. त्यावर तो खुप दुःखी होतो,आणि सकाळ होताच तिच्या अंथरुणा शेजारी एकचिठ्ठी ठेऊन दुर निघुन जातो.जेव्हा ती चिठ्ठी ती वाचते तर ती ढसाढसा रडते त्यात फक्त एवढच लिहलं होतं..." I LOVE U...PLEASE TAKE CARE OF MY EYES.."..
Subscribe to:
Posts (Atom)